Tarun Bharat

पाकचा आज स्कॉटलंडविरुद्ध औपचारिक सामना

Advertisements

वृत्त संस्था/ शारजा

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे पाकिस्तान-स्कॉटलंड यांच्यातील औपचारिक सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. गट-2 मध्ये पाक संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना आतापर्यंत आपले चारही सामने जिंकून उपांत्य फेरीत यापूर्वी स्थान मिळविले आहे. पाकचा संघ आजही आपली विजयी घोडदौड कायम राखण्यावर भर देईल.

2009 साली आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान सघाने जेतेपद मिळविले होते. त्यानंतर या स्पर्धेच्या इतिहासात पाक संघाने सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंतचे प्राथमिक फेरीतील चारही सामने जिंकून गट-2 मध्ये आठ गुणांसह आघाडीचे स्थान पटकाविले आहे. पाक संघाने या स्पर्धेला दमदार सुरूवात करताना पारंपारिक प्रतिस्पर्धी भारताला 10 गडय़ांनी हरविले. त्यानंतर दुसऱया सामन्यात त्यांनी न्यूझीलंडवर 5 गडय़ांनी मात केली. तिसऱया सामन्यात अफगाण संघाची कामगिरी बऱयापैकी झाल्याने पाकला विजयासाठी थोडे झगडावे लागला तर चौथ्या सामन्यात पाकने नामिबियाचा 45 धावांनी पराभव करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

पाक संघातील बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची फलंदाजी बहरत आहे. मधल्या फळीतील असिफ अली उपयुक्त फटकेबाजी करण्यात यशस्वी ठरत असल्याने पाक संघाला सलग विजय मिळविता आले आहेत. फक्र झमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक यांची कामगिरी समाधानकारक होत आहे. गोलंदाजीमध्ये हॅरीस रौफ, शाहीन आफ्रिदी, इमाद वासिम आणि शदाब खान यांच्या कामगिरी सातत्य दिसत आहे. हसन अली सूर मिळविण्यासाठी झगडत आहे.

या स्पर्धेत स्कॉटलंड संघाला शुक्रवारच्या सामन्यात भारताकडून 8 गडय़ांनी दणदणीत पराभव पत्करावा लागला. स्कॉटलंड संघाचे या स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्याचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. कर्णधार कोत्झेर, बेरिंग्टन,बज, क्रॉस, डेव्हि, इव्हान्स हे स्कॉटलंड संघातील प्रमुख खेळाडू आहेत. रविवारच्या सामन्यात स्कॉटलंडचा संघ आपल्या परीने बलाढय़ पाकविरूद्ध कडवी लढत देण्याचा प्रयत्न करेल.

Related Stories

अंडर 20 – जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमित खत्रीने पटकावले रौप्य पदक

Tousif Mujawar

साक्षी म्हणते, अफवांवर विश्वास ठेवू नका!

Patil_p

जखमी वॅग्नरच्या जागी मॅट हेन्रीला संधी

Patil_p

पाकिस्तानचा झिम्बाब्वेविरुद्ध 11 धावांनी विजय

Patil_p

इंग्लंडच्या माजी फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा

Patil_p

पाकची द.आफ्रिकेवर 33 धावांनी मात

Amit Kulkarni
error: Content is protected !!