Tarun Bharat

पाकचा कट उधळला; पंजाब पोलिसांककडून जवानासह तिघांना अटक

ऑनलाईन टीम / चंदीगढ :

भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनच्या मदतीने अंमली पदार्थ आणि शस्त्राची तस्करी केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी एका जवानासह तिघांना अटक केली आहे. पंजाब पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राहुल चौहान असे या जवानाचे नाव असून, तो भारतीय लष्करात नायक हुद्यावर आहे. तर धर्मेंद्र सिंग आणि बालकर सिंग अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चौहान हा भारत-पाकिस्तान सीमेवर जीपीएस आधारीत ड्रोनद्वारे पिस्तूलाची तस्करी करुन त्याचे प्रशिक्षण देत होता. याशिवाय अंमली पदार्थांचीही तो तस्करी करत होता. पंजाब पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार पंजाब पोलिसांनी कारवाई करत आरोपींकडून चीनी बनावटीचे दोन ड्रोन, 12 ड्रोन बॅटरी, ड्रोन कंटेनर, इन्सास रायफल काडतूसे, दोन वॉकी-टॉकी सेट, मोठय़ा प्रमाणावर अंमली पदार्थासह 6 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पंजाब पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

‘The Kashmir Files’ चित्रपटाच्या टीमचे दहशतवाद्यांशी कनेक्शन : मांझी

Archana Banage

बाबरी उद्ध्वस्तीकरणासंबंधीची सर्व प्रकरणे बंद

Patil_p

देशभरातील रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद

tarunbharat

कमल हासन यांना कोरोनाची लागण

Patil_p

दिल्लीत कोरोना टेस्ट तिप्पट करणार : अमित शाह

datta jadhav

चंदा कोचर यांची कारागृहातून सुटका

Patil_p