Tarun Bharat

पाकची मालिकेत विजयी आघाडी

Advertisements

वृत्तसंस्था/ रावळपिंडी

रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियमवर रविवारच्या दुसऱया टी-20 सामन्यात पाकिस्तानने झिंबाब्वेला 8 गडय़ांनी हरवित तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. नाबाद अर्धशतक झळकवणाऱया हैदर अलीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

पाकने झिम्बाब्वेला 20 षटकांत 7 बाद 134 धावांवर रोखले. पाक संघातील फिरकी गोलंदाज उस्मान कादीर आणि वेगवान गोलंदाज हॅरीस रौफ यांनी प्रत्येकी  तीन गडी बाद केले. त्यानंतर पाकने 15.1 षटकांत 2 बाद 137 धावा जमवित सहज विजय मिळविला. पाकतर्फे कर्णधार बाबर आझमने 28 चेंडूत 51 धावा जमविताना हैदर अलीसमवेत 100 धावांची भागीदारी केली. हैदरने खुशदिलच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. हैदर 43 चेंडूत 66 धावांवर तर खुशदिल शहा 11 धावांवर नाबाद राहिला. हैदरच्या खेळीत 6 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता.

या दुसऱया सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून झिंबाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. पाकच्या अचूक गोलंदाजीसमोर झिंबाब्वेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. झिंबाब्वेतर्फे रेयान बुरीने नाबाद 32 तर वेस्ले मधेवेरेने 24 धावा जमविल्या. झिंबाब्वेच्या डावातील शेवटच्या चेंडूवर बुरीने षटकार खेचला. पाकतर्फे उस्मान कादीरने 23 धावांत 3 तर रौफने 31 धावांत 3 गडी बाद केले. रौफने गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-20 क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करताना 20 बळी मिळविले होते. रविवारच्या सामन्यात रौफने टेलरला 3 धावांवर तर कर्णधार चिबाबाला 15 धावांवर बाद केले. डी तिरिपानो आणि बुरी यांनी 7 व्या गडय़ासाठी 30 धावांची भागिदारी केली. तिरिपानोने 15 धावा जमविल्या. उस्मान कादीरने मधेवेरे, सिकंदर रझा आणि चिगुंबुरा याचे बळी मिळविले. रझाने 7 तर चिगुंबुराने 18 धावा जमविल्या. पाकचे पंच एहसान रझा हे या सामन्यात पंचगिरी करत होते. टी-20 प्रकारात 50 सामन्यात पंचगिरी करणारे रझा हे पहिले पंच आहेत.

संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे 20 षटकांत 7 बाद 134 (रौफ व उस्मान कादिर प्रत्येकी 3 बळी), पाक 15.1 षटकांत 2 बाद 137 (बाबर आझम 51, हैदर अली नाबाद 66).

Related Stories

ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रव्हिस हेडला कोरोना

Patil_p

पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Amit Kulkarni

बुमराहच्या विवाह सोहळय़ासाठी फक्त 20 निमंत्रित!

Patil_p

ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी भारतीय संघनिवड पुढील आठवडय़ात

Patil_p

पुढील बॅडमिंटन हंगामात नव्या गुणपद्धतीचा अवलंब

Patil_p

इव्हान्सला हरवून बुस्टा अंतिम फेरीत

Patil_p
error: Content is protected !!