Tarun Bharat

पाकच्या मंत्र्यांचा पीर बाबा बनून महिलांना गंडा

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पीर बाबा बनून मुल्तान प्रांतात अनेक महिलांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. एका संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मागील काही वर्षांपासून कुरेशी हे मुल्तान प्रांतात मुरीदी नावाची पद्धत चालवत आहेत. ते स्वतः पीर बाबा असल्याचे लोकांना सांगतात. तसेच त्यांच्याकडून भक्ती आणि निष्ठेची शपथ घेतात. महिलांना मात्र तो निष्ठेच्या बदल्यात स्वतःकडून केस कापून घ्यायला लावायचा. पीर बाबाकडून केस कापून घेतल्याने पापांपासून मुक्ती मिळते, असा प्रचार ते करत आहेत.

महिलांचे केस कापत असल्याचा कुरेशी यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. केस कापून देण्याच्या बदल्यात कुरेशी महिलांकडून पैसे, सोने किंवा चांदी घेत असल्याचीही माहिती समोर आली आहे. कुरेशी यांच्यावर सर्व स्तरातून कडाडून टीका होत आहे. 

Related Stories

दिल्ली सरकारनं घेतला मोठा निर्णय! सर्व खासगी कार्यालयांना…

Archana Banage

ओडिशामध्ये आणखी 16 दिवस वाढविले लॉकडाऊन!

Tousif Mujawar

यूपी : लस खरेदी जागतिक निविदेच्या अटी शिथिल

datta jadhav

कर बुडव्या व्यापाऱ्यांना चौदा लाखांचा दंड

Archana Banage

गलवान खोऱ्यात हल्ल्याची योजना आखणाऱ्या चिनी अधिकाऱ्याची बदली

datta jadhav

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या 10-12 वीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत

Tousif Mujawar