Tarun Bharat

पाकला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा जोरदार झटका

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

कर्जबाजारी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक अब्ज डॉलर्सचे कर्ज नाकारले आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता चीन किंवा अन्य आखाती देशांसमोर पैशांसाठी हात पसरावे लागणार आहेत.

उध्वस्त अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 6 अब्ज डॉलर्स मदत केली होती. त्याअंतर्गतच एक अब्ज डॉलर्सचा हप्ता पाकिस्तानला दिला जाणार होता. मात्र, पाकची वागणूक पाहता आंतराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला कर्ज देण्यास नकार दिला आहे. आंतराष्ट्रीय नाणेनिधीचे मन जिंकण्यास इम्रान खान सरकारने गेल्या काही दिवसांत देशातील वीज दरात 1.39 रुपये प्रति युनिट, पेट्रोलच्या दरात 10.49 रुपयांची तर डिझेलच्या दरात 12.44 रुपायांची वाढ केली होती. तरी देखील पाक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला मनवू शकले नाही. पण सर्वसामान्य नागरिक मात्र महागाईने हवालदिल झाला आहे.

Related Stories

अँटनी ब्लिंकन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

datta jadhav

किम जोंग यांची प्रकृती गंभीर?

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

न्यूझीलंडमध्ये पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के

Patil_p

डॉ. फैसल सुलतान पाकचे नवे आरोग्यमंत्री

datta jadhav

संकटात शोधली संधी

Patil_p