Tarun Bharat

पाकव्याप्त काश्मिरमध्ये 1124 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

भारताचा आक्षेप धुडकावून पाकव्याप्त काश्मिरमध्ये वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. झेलम नदीच्या किनारी हा प्रकल्प उभारला जाणार असून, या प्रकल्पाद्वारे पाच अब्ज युनिट वीज उपलब्ध होणार आहे.

पाकव्याप्त काश्मिरमध्ये वीजप्रकल्प उभारण्यास भारताने पाकला विरोध केला होता. तरी देखील पाकिस्तानने तिथे 1124 मेगावॅट क्षमतेचा वीजप्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक त्रिपक्षीय करार निश्चित करण्यात आला असून, एका चिनी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 

कोहला जलविद्युत प्रकल्प असे या प्रकल्पाचे नाव असेल. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी 2.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. प्रकल्पाद्वारे पाच अब्ज युनिट वीज स्वस्तात उपलब्ध होईल. हा प्रकल्प पाकिस्तानने बेकायदेशीररित्या बळकावलेल्या जागेत उभा राहत असल्याने भारताने या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

Related Stories

नीरव मोदीच्या हाँगकाँगमधील २५३ कोटींच्या संपत्तीवर टाच

Archana Banage

व्हॉट्सऍप ग्रूपसाठी सेक्रेटरी

Patil_p

सोनोवाल, मुरुगन शपथबद्ध

Patil_p

अब्जावधींचा रोजगार धोक्यात

Patil_p

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Archana Banage

शिवसैनिकांच्या केसाला जरी हात लागला तर…ठाकरेंचा इशारा

Abhijeet Khandekar