Tarun Bharat

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

वृत्तसंस्था/ जम्मू

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) परिसरातील गावे आणि पूंछ आणि काठुरा जिल्हय़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सुरू असणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन रविवारीही सुरूच राहिले. कसबा आणि केरेन सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या उखळी तोफांच्या माऱयात महिला गंभीर जखमी झाली, अशी माहिती भारतीय सैन्यदलाच्या प्रवक्त्यांनी दिली.

  मागील दोन दिवसांपासून दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी सीमेवर पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू आहे. भारतीय सैन्यदलाने शनिवारी चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या 12 सैनिकांना कंठस्नान घातले होते. तसेच शस्त्रकोठारेही उडवून दिली होती. रविवारी पाकिस्तानने केलेल्या तोफगोळय़ांच्या माऱयात एक महिला गंभीर जखमी झाली. तसेच शेकडो घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमी महिलेला भारतीय जवानांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Related Stories

कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शाहांनंतर आता जी-२३ नेत्यांची घेणार भेट

Archana Banage

‘ब्लू टिक’साठी मोदी सरकार भांडतंय मात्र लसीसाठी…? ; राहुल गांधींचे सूचक ट्वीट

Archana Banage

भारतातून ‘कोव्हिशिल्ड’ची दमदार निर्यात

Patil_p

दिल्ली : सफदरजंग रुग्णालयातील आयसीयू वॉर्डला भीषण आग

Tousif Mujawar

एनआयएचे चेन्नईत अनेक ठिकाणी छापे

Amit Kulkarni

न्यायव्यवस्थेत पारदर्शित्व नसल्याचा रिजीजूंचा आरोप

Amit Kulkarni