पाकिस्तानातही कोरोनाची दुसरी लाट तीव्रपणे पसरू लागली असून देशातील सरकारी व खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरून गेली असल्याचे वृत्त आहे. प्रतिदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी असूनही रुग्णसंख्या वाढली असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दुसरी लाट लवकर आटोक्यात आली नाही, तर मात्र रुग्णालयांमध्ये जागाच उरणार नाही असा इशारा डॉक्टरांच्या एका गटाने दिला. कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर इत्यादी मोठय़ा शहरांमधील दाट वस्तीच्या भागांमध्ये रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. तरीही नियमांचे पालन करण्यात लोक ढिलाई दाखवत आहेत.


previous post