Tarun Bharat

पाकिस्तानच्या सैन्याला राजकीय आव्हान

राजकीय निर्णय सैन्यमुख्यालयी नव्हे तर संसदेत व्हावेत : मरियम

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

पाकिस्तानात सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे जवळपास अशक्य मानले जाते. परंतु आता माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरीयम आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी उघडपणे सैन्याच्या राजकारणातील हस्तक्षेपाला विरोध करत आहेत. या दोघांनीही पंतप्रधान इम्रान खान यांच्यापेक्षा सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला आहे. राजकीय किंवा देशाशी निगडित निर्णय संसदेत व्हावेत, सैन्यमुख्यालयात नकोत असे मरियम यांनी म्हटले आहे.

सैन्याच्या मदतीने सत्ता प्राप्त करणारे इम्रान खान यांचे सरकार पाडविण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. 1 ऑक्टोबरपासून सर्व विरोधी पक्ष आंदोलन सुरू करणार आहेत. 21 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली आहे. सैन्य आणि आयएसआय प्रमुखांनी 16 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षांच्या काही नेत्यांची भेट घेतली होती असा खुलासी झाला आहे. दोघेही विरोधकांवर आंदोलन रोखण्याचा आणि सैन्याचे नाव न घेण्यासाठी दबाव निर्माण करू पाहत होते.

मरियम यांचे प्रत्युत्तर

नवाज यांच्या पक्षाचे एक नेते मदतीसाठी सैन्यप्रमुखांना भेटायला आले होते असे सैन्याकडून सांगण्यात आले. माझ्या कुटुंबाचा कुठलाच सदस्य बाजवा यांना भेटायला गेलेला नाही असे स्पष्टीकरण मरियम यांनी दिले आहे. राजकीय विषय संसदेतच निश्चित केले जावेत, याकरता सैन्यमुख्यालयात जाऊ नये असे म्हणत मरियम यांनी सैन्यावर निशाणा साधला आहे.

बाजवा बॅकफुटवर

अलिकडच्या काळात इम्रान खान आणि सैन्याच्या विरोधात राजकीय पक्षांनी मोठय़ा प्रमाणात विधाने केली आहेत. इम्रान खान यांच्या पुरस्कृर्त्यां (सैन्य) बद्दल आम्हाला अधिक  आक्षेप आहे. देशात लोकशाही जिवंत रहायला हवी. हुकुमशाहीचा काळ निघून गेल्याचे उद्गार नवाज शरीफ यांनी 21 रोजीच्या सर्वपक्षीय बैठकीला संबोधित करताना काढले होते.

Related Stories

‘नीट’ नंतर जेईई मेन्समध्येही ‘फिट’

Patil_p

कृष्ण जन्मोत्सव दिवसा साजरे करणारे मंदिर

Patil_p

वित्तीय तूट जून अखेरीस 18.2 टक्के

Patil_p

बाधितांचा आकडा 91 लाखांच्या टप्प्यात

Omkar B

उत्तराखंड : कोरोनापेक्षा अधिक घातक ‘ब्लॅक फंगस’; मृत्यू दर 15.73 %

Tousif Mujawar

राजस्थानचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

Patil_p