Tarun Bharat

पाकिस्ताननेही दिला चीनला झटका; घातली ‘बिगो’ ॲपवर बंदी

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानने मित्र राष्ट्र असलेल्या चीनच्या बिगो ॲपवर बंदी घालून चीनला मोठा धक्का दिला आहे. तसेच टिकटॉकलाही अंतिम इशारा दिला आहे. 

बिगो ॲपमधून अश्लील व्हिडीओ आणि अनैतिक फोटो दाखवल्याप्रकरणी ही बंदी घालण्यात आली आहे. बिगो आणि टिकटॉक पोर्नोग्राफीचा मोठा स्रोत होता. या अ‍ॅपबाबत समाजातील विविध घटकांकडून तक्रारी आल्या होत्या. याबाबत कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे बिगोवर बंदी घालण्यात आली. तर टिकटॉकलाही इशारा देण्यात आला आहे. 

यापूर्वी लाहोर उच्च न्यायालयात टिकटॉकवर त्वरित बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. हा खेळ इस्लामविरोधी असून, या खेळाने तरुणांना व्यसन लागल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने पबजी या गेमिंग ॲपवरही बंदी घातली आहे. 

Related Stories

विधानसभा निवडणूक : काँग्रेस व्हर्च्युअल प्रचारासाठी सज्ज

Abhijeet Khandekar

विश्रामबाग पुलावर शार्टसर्किटमुळे दुचाकी जळून खाक

Archana Banage

नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली

Archana Banage

अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात पुण्यात तक्रार; कारवाईची मागणी

datta jadhav

सुशांत आत्महत्या : तपास सीबीआयकडे; पार्थ पवार म्हणाले…

Tousif Mujawar

तुर्की-सीरियात आतापर्यंत 435 भूकंपांची नोंद, 7,700 लोकांचा मृत्यू

Archana Banage