Tarun Bharat

पाकिस्तानमधून ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी पाकिस्तानमधील कराचीतून आली आहे. कराचीतून धमकीचा फोन आल्यानंतर हॉटेल परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

कराचीतून सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास धमकीचा फोन आला. ताजच्या कर्मचाऱ्याने हा फोन उचलल्यावर समोरून आपण लष्कर-ए-तोयबचा सदस्य बोलत असल्याचे त्याने सांगितले. कराचीत शेअर बाजारावर हल्ला झाला, आता ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्यात येईल. आमचे सदस्य 26/11 ची पुनरावृत्ती करतील, अशी धमकी त्याने दिली.

तर वांद्र्यातील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये त्याच नंबरवरून धमकीचा दुसरा फोन आला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीकडून अशाच प्रकारे धमकी देण्यात आली. दोन्ही हॉटेलच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सायबर विभाग फोन कॉल्स चेक करत आहेत.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफला मोठे यश

Patil_p

युएनजीए अध्यक्षांच्या विधानाला भारताचा विरोध

Patil_p

लुधियाना स्फोटामागे माजी पोलीस कर्मचारी

Patil_p

पुणे ग्रामीण मंडलातील 2613 शेतकरी कृषिपंपाच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त

Rohan_P

कोरोना उपचारासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी

Patil_p

बँक बुडल्यास 5 लाखांपर्यंत रक्कम सुरक्षित

Patil_p
error: Content is protected !!