Tarun Bharat

पाकिस्तानात ननकाना साहीब गुरुद्वारावर हल्ला

Advertisements

ऑनलाईन टीम

पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवरील हल्ले सुरूच असून आता शिख समुदायाचे पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या ननकाना साहीब गुरुद्वारावर हल्ला झाला आहे. शुक्रवारी दुपारी झुंडीने आलेल्या लोकांनी गुरुद्वारावर दगडफेक सुरू केली. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले असले तरी तणाव कायम आहे. मुस्लिम कट्टरपंथीयांनी हा हल्ला केला असून ननकाना साहीबमधून शिख समाजाला पिटाळून लावून शहराचे नाव गुलाम अली मुस्तफा करण्याची धमकी देण्यात येत आहे.

कट्टरपंथीयांच्या हल्ल्यामुळे गुरु नानक यांचे जन्मस्थळ असणाऱ्या ननकाना साहीब येथील गुरुद्वारात पहिल्यांदाच किर्तन झाले नाही. शिख बांधव गुरुद्वारात अडकून पडले आहेत. बाहेर दहशतीचे वातावरण असून काही ठिकाणी शिख बांधव घरांतही लपून बसले आहेत.

कट्टरपंथीयांच्या झुंडीचे नेतृत्त्व गत वर्षी ननकाना साहीब येथील एका शिख मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या आरोपी मोहम्मद हसनचे कुटुंबीय करत आहेत. पाकिस्तानातील या हल्ल्याचा अकाली दलाने निषेध व्यक्त केला आहे.

Related Stories

आयुष्यात केवळ एकदाच स्नान

Patil_p

शिकागोत सिरीयल किलिंग; 3 निष्पापांचा बळी

datta jadhav

पडझडीनंतर शेअरबाजार सावरला

tarunbharat

Kolhapur; राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल!

Abhijeet Khandekar

किम जोंग उन कोमात, बहिणीकडे सत्तासूत्रे

Patil_p

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav
error: Content is protected !!