Tarun Bharat

पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा तरुण अटकेत

ऑनलाईन टीम / नाशिक : 

पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणाऱ्या तरुणाला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे. दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर लष्कराकडून त्याच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संजीवकुमार (वय 21, रा. आलापूर, पो. सुनबरसा, जि. गोपालगंज, बिहार) असे हेरगिरी करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तो देवळाली कॅम्प रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या चिंतामण बस स्टॉपजवळील पडक्या शेडमध्ये राहून पाकिस्तानासाठी हेरगिरी करत होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, आर्मी इन्‍टलिजन्सच्या यश तोफखाना केंद्रात विविध कामे ठेकेदारांकडून करून घेतली जातात. या ठेकेदारांचा मजूर म्हणून हा तरुण तोफखाना केंद्रात यायचा. काही दिवसांपासून लष्करातील गोपनीय विभाग त्याच्यावर पाळत ठेवून होता. शुक्रवारी (दि.2) सायंकाळी साडेसात वाजता तोफखाना एमएच गेट भागात लष्कराच्या प्रतिबंधित भागातील छायाचित्र काढून ते व्हॉटसॲप ग्रुपद्वारे थेट पाकिस्तानला पाठविताना त्याला पकडण्यात आले. दोन दिवसांच्या तपसाअंती त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

नौसेनेचे ग्लायडर कोसळले; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

datta jadhav

महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा अखेर रद्द

Tousif Mujawar

‘नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधणारे अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर देशभर सुरू करणार’

Archana Banage

लहान भावाने पब्जी खेळण्यास मोबाईल न दिल्याने मोठ्या भावाची आत्महत्या

Tousif Mujawar

महाराष्ट्र : 4,122 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 %

Tousif Mujawar

मोफत एसटी बस प्रवासाची सुविधा फक्त ‘या’ व्यक्तींसाठीच उपलब्ध

Archana Banage