Tarun Bharat

पाकिस्तानातील मशिदी कोरोन प्रसाराची केंद्रे

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

पाकिस्तानातील मशिदी या कोरोनाप्रसाराची घातक केंद्रे बनत चालल्या आहेत, असा गंभीर इशारा त्या देशातील इस्लामिक वैद्यकीय संघटनेने (पीएमआयए) दिला आहे. लोकांनी रमझानची नमाज घरातच करावी, अशी सूचनाही या संघटनेने केली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या कोरोनाचे 12 हजारांहून अधिक रूग्ण असून दशसहस्रावधी लोकांनी आपला आजार लपविल्याचेही अनुमान आहे. त्यामुळे तेथील रूग्णांची व मृतांची नेमकी संख्या कळणेही अशक्य झाल्याचे तेथील वृत्तपत्रे व पत्रकारच म्हणत आहेत. एका महिन्यात पाकमध्ये 6000 रूग्ण आढळून आले होते. मात्र, ही संख्या अवघ्या 6 दिवसात दुप्पट झाली. पाकमधील दहशतवादी संघटना आणि कट्टरपंथीयांचा मशिदी बंद करण्यास विरोध असल्याने तेथील सरकारने मशिदी चालूच ठेवल्या आहेत. त्यामुळे धोका प्रचंड वाढला आहे.

Related Stories

महिलेच्या स्वरुपात राहतात पुरुष

Patil_p

52 वर्षांमध्ये 69 टक्क्यांनी घटली वन्यजीवांची संख्या

Amit Kulkarni

युक्रेनबाहेर पडले 38 लाख लोक

Patil_p

पाकिस्तानी विमानांना चीनमध्ये तात्पुरती बंदी

Patil_p

रशियाचे सैनिक होऊ लागले हताश

Patil_p

डब्ल्यूएचओच्या पथकाला प्रवेश देण्यास चीनचा नकार

Omkar B