ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा संकरावतार पाकिस्तानात पोहोचला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या 12 जणांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली असता यात पहिल्या टप्प्यात 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील 3 जणांमध्ये कोरोना विषाणूचा नवा संकरावतार आढळून आल्याची माहिती सिंध प्रांताच्या आरोग्य विभागाने दिली आहे. परीक्षणादरम्यान जीनचे स्वरुप ब्रिटनच्या नव्या कोरोनाच्या संकरावताराशी 95 टक्के साधर्म्य दर्शवित असल्याचे आढळून आले आहे. या नमुन्यांची आता पुढील टप्प्याची चाचणी करण्यात येणार आहे. या लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ओळख पटविली जात असल्याची माहिती सिंध प्रांताच्या आरोग्य विभागाच्या प्रवक्त्या मीरन युसूफ यांनी दिली आहे.


previous post
next post