पेशावर : पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदायांच्या विरोधातील हिंसाचाराचे नवे उदाहरण पेशावरमधून दिसून आले आहे. तेथे शीख समुदायाच्या एका व्यक्तीची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली आहे. पेशावरमध्ये यूनानी हकीम सरदार सतनाम सिंह (खालसा) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळय़ा झाडल्या आहेत. पोलिसांनुसार सतनाम यांच्यावर 4 गोळय़ा झाडण्यात आल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. सिंह हे हसनदलचे रहिवासी होते आणि शहरात दवाखाना चालवत होते. सिंह यांच्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची शक्यता विचारात घेत तपास केला जात आहे. पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन, शीख आणि पारशी समुदायाला अत्याचारात तोंड द्यावे लागत आहे.


previous post
next post