Tarun Bharat

पाकिस्तानात शीखांवर त्याचार, भारताकडून निषेध

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पाकिस्तानातील जगप्रसिद्ध गुरूद्वारा आणि शीखांचे प्रथम गुरू नानकदेव यांची कर्मभूमी असलेल्या नानकानासाहेब येथे शीख भाविकांवर हल्ले होण्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील अल्पसंख्य समुदायांची स्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाल्नी आहे. भारताने या हल्ल्यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून पाकिस्तानात अल्पसंख्याकांची स्थिती दयनीय असल्याची टीका केली आहे. शुक्रवारी नानकानासाहेब येथील गुरूद्वारात प्रार्थनेसाठी जमलेल्या साधारणतः 200 शीख भाविकांवर स्थानिक मुस्लीमांकडून हल्ले करण्यात  आले. या हल्ल्यांमधून मुले व स्त्रियाही सुटल्या नाहीत. पोलिसांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली. हे प्रकार मानवतेला काळीमा फासणारे आहेत, अशी टीका भारताने केली आहे. पाक सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे.

 

Related Stories

बैलगाडी शर्यतींबाबत 15 डिसेंबरला निर्णय

Patil_p

सेन्सेक्स पुन्हा घसरणीसह बंद

Patil_p

बिहारमध्ये दिवसभरात 668 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

पंतप्रधान मोदी घाबरट : राहुल गांधी

Patil_p

कोरोना संसर्गावरील उपचार होणार 40 टक्क्यांनी स्वस्त

Patil_p

सिंघु बॉर्डरवर तैनात दोन पोलीस ऑफिसर कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar