Tarun Bharat

पाकिस्तानात 7 लाखाहून अधिक कोरोना लसी वाया

Advertisements

कराची

 कोरोनाच्या या महामारीत काही देशांना अद्याप कोरोनाच्या लसी पोहचायच्या असतानाच पाकिस्तानात मात्र लसी वाया घालवण्याचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात जवळपास 7 लाख कोरोना प्रतिबंधक लसी वाया घालवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लसीचा पुरवठा करूनदेखील त्याचे योग्य नियोजन न केल्यानेच हा प्रकार पाकिस्तानात घडल्याचे समजते. सिंध प्रांताकरीता दिलेल्या लसीचे व्यवस्थापन योग्यपणे हाताळले न गेल्याने वर म्हटल्याप्रमाणे तब्बल 7 लाख लसी वाया गेल्या आहेत. तेथील स्थानिक माध्यमांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार एकूण लसीपैकी 2 टक्के लसी खराब झाल्या तर चालू शकते. पण हे मापदंड मात्र पाकिस्तानाने पाळलेले नाहीत. सिनोवॅकच्या 2 लाख 20 हजार 675 लसी, सिनोफार्मच्या 1 लाख 70 हजार 675 लसी, पाकवॅकच्या 70 हजार 876 लसी, ऍस्ट्राझेनेकाच्या 23 हजार 96, मॉडर्नाच्या 10 हजार 675, फायझरच्या 10 हजार 178 लसी तसेच स्पुतनिकच्या 85 लसी खराब झाल्या असल्याची बाब समोर आली आहे.

Related Stories

कोरोना काळात ब्लड गॅस टेस्ट आवश्यक

Patil_p

लवकरच युक्रेनवर हल्ला करू शकतो रशिया

Patil_p

अपुरी व्यवस्था

Omkar B

तालिबानची अमेरिकेला धमकी

datta jadhav

वायरलेस चार्ज होणार इलेक्ट्रिक वाहन

Patil_p

जगातील सर्वात मोठ्या टायर इम्पयार्डला आग

datta jadhav
error: Content is protected !!