Tarun Bharat

पाकिस्तानी ड्रोनचा भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या आर्निया सेक्टरमध्ये आज पहाटे 4.25 वाजता पाकिस्तानी ड्रोन आंतरराष्ट्रीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करत होता. बीएसएफच्या सतर्क जवानांनी 20 ते 25 राऊंड फायर केल्यानंतर हा ड्रोन परतला.  

शनिवारी जम्मू हवाई दलाच्या स्थानकावर ड्रोन हल्ला झाला होता. त्यानंतर रविवारी रात्री जम्मूतील कालुचक लष्करी तळावर अज्ञात ड्रोन दिसले. सोमवारी रात्री उशिरा सुंजवान लष्करी स्थानकाजवळ एक संशयास्पद ड्रोन आढळला. बुधवारी जम्मूच्या मीरान साहिब आणि कालुचक भागात पहाटे 4.40 वाजता दोन ड्रोन तर कुंजवानी येथील हवाई दलाच्या स्टेशन सिग्नलजवळ पहाटे 4.42 मिनिटांनी एका संशयास्पद ड्रोनचा वावर होता. मागील 6 दिवसात जम्मूतील लष्करी छापवण्यांच्या परिसरात 8 ड्रोन आढळून आल्याने सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

दिल्लीत 127 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

Tousif Mujawar

सीमावादावर केंद्राच्या हालचालींना वेग; अमित शाहांनी बोलावली दोन्ही राज्यांची बैठक

datta jadhav

पश्चिम बंगालमधील राजकीय वाप्युद्ध सुरूच

Patil_p

70 हजार कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी

Amit Kulkarni

देवाला मिळतात दररोज 150 पत्रं

Patil_p

वादग्रस्त वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांची जाहीर माफी

datta jadhav