Tarun Bharat

पाकिस्तानी नागरिकांकडून 150 कोटींचे हेरॉईन जप्त

अहमदाबाद / वृत्तसंस्था

आठ पाकिस्तानी नागरिक प्रवास करीत असलेली बोट ताब्यात घेऊन त्यातील 150 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. ही घटना गुजरातजवळच्या अरबी समुद्रातील तटाजवळ घडली. गुप्तचरांनी पुरविलेल्या माहितीनुसार भारतीय तटरक्षक दलाच्या बोटींना या पाक नागरिकांच्या बोटीचा पाठलाग केला. बोट ताब्यात घेऊन सर्व आठ पाक नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ 30 किलो हेरॉईन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 150 कोटी रुपये आहे. पाक नागरिकांची चौकशी सुरू आहे. गेल्या वर्षभरात पकडण्यात आलेला हा हेरॉईनचा सर्वात मोठा साठा असल्याचही माहिती देण्यात आली.

Related Stories

बोधगयामध्ये चिनी महिलेला अटक

Amit Kulkarni

पंजाबमध्ये विजेचे संकट गडद

Amit Kulkarni

‘230’ स्पीडने बीएमडब्ल्यूची कंटेनरला धडक, चौघे ठार

Patil_p

दिलासादायक ! देशात कोरोनामुक्तांची संख्या वाढली

Archana Banage

बाल लैंगिक शोषणप्रकरणी सीबीआयचे 20 राज्यात छापे

Patil_p

प्रदूषणास पाकमधील हवा कारणीभूत

Patil_p