Tarun Bharat

पाकिस्तान गिलगिट, बाल्टीस्तानची स्वायत्तता रद्द करणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

चीनच्या दबावाखाली येऊन पाकिस्तान गिलगिट आणि बाल्टीस्तानमधील स्वायत्तता रद्द करुन तिथे सर्वसामान्य कायद्याचा अंमल जारी करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लवकरच यासंदर्भातील घोषणा करणार आहेत. 

गिलगिट आणि बाल्टीस्तान हे पाकव्याप्त काश्मीरचा भाग असलेले प्रदेश आहेत. हे प्रदेश पंजाबी संस्कृतीशी निगडित असल्याने पाकिस्तानच्या चालीरितीपासून दूर असतात. तेथील नागरिक स्वतःला पाकिस्तानी मानत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून नेहमीच या प्रदेशाला दुजाभाव मिळतो. पाकिस्तान चीनच्या दबावाखाली वावरत असल्याने या परिसराचे चीनकडून शोषण होत आहे.

पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या नावाखाली चीन या प्रदेशात अनेक प्रदूषणकारी प्रकल्प उभे करत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, पर्यटन आणि शेती धोक्यात आली आहे. मकपून दास या भागातील नागरिकांना इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या प्रकल्पासाठी जबरदस्तीने घरे खाली करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना कोणताही मोबदला अथवा पुनर्वसन करण्यात आले नाही. इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या नावाखाली नागरिकांच्या होणाऱ्या पिळवणुकीला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांनाही पाक गुप्तचर यंत्रणांकडून धमकावले जात आहे.

Related Stories

युद्धाचा भडका

Amit Kulkarni

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रॅली रवाना

Rohit Salunke

आणखी तीन क्षेपणास्त्रांची उत्तर कोरियाकडून चाचणी

Patil_p

बलुचिस्तानात स्फोट, 3 ठार, 29 जखमी

Patil_p

पाण्यावर चालण्यासाठी पैसे मोजताहेत लोक

Patil_p

इथेच शिकू नाहीतर मरू; पण मायदेशी परतणार नाही…

datta jadhav