Tarun Bharat

पाकिस्तान : नवे दिशानिर्देश

जागतिक महामारीच्या दुसऱया लाटेला सामोरा जाणाऱया पाकिस्तानने देशात विवाहसोहळय़ांच्या आयोजनासंबंधी नवे दिशानिर्देश लागू केले आहेत. . नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरने विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अतिरिक्त दिशानिर्देश घोषित केले आहेत. यानुसार विवाह सोहळय़ांमध्ये सामील लोकांना 6 फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. सोहळा 2 तासांहून अधिक कालावधीचा नसावा आणि रात्री 10 वाजेपर्यंत सोहळा आटोपता घ्यावा असे बजावण्यात आले आहे. तसेच प्रत्येकाला मास्कचा वापर करावा लागणार आहे.

तसेच आयोजकांना प्रवेशद्वारावरच आसनक्षमतेचा उल्लेख करावा लागणार आहे. बुफे डिनरवर बंदी घालण्यात आली असून केवळ ‘लंच बॉक्स’मध्ये जेवण देण्याची अनुमती असणार आहे.

Related Stories

अमेरिकेचा व्हिसा मिळविणे होणार सुलभ

Patil_p

सुदानमध्ये आता लोकशाही नांदणार

datta jadhav

ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे ब्रिटनमध्ये हाय अलर्ट

Patil_p

आर्मेनिया : देशरक्षणासाठी पंतप्रधानांच्या पत्नी ॲना युद्ध मैदानात

datta jadhav

कॅनडात जाणारे हवाई प्रवासी 22 पासून होणार क्वारंटाईन

Patil_p

बिनतारी संगणकीय जाळय़ाचा जनक हरपला

Patil_p