Tarun Bharat

पाकिस्तान : रावळपिंडीत 100 वर्ष जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला

Advertisements

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरातील शंभर वर्ष जुन्या हिंदू मंदिरावर अज्ञात टोळक्याने हल्ला करत मंदिराची तोडफोड केली. 

याप्रकरणी इवॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) उत्तर झोनचे सुरक्षा अधिकारी सय्यद रझा अब्बास झैदी यांनी रावळपिंडीच्या बन्नी ठाण्यात या हल्ल्याची तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावळपिंडीत तोडफोड करण्यात आलेल्या मंदिराच्या नुतनीकरणाचे काम मागील एक महिन्यापासून सुरू आहे. 24 मार्चला या मंदिरासमोरील अतिक्रमण हटवण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास 10 ते 15 लोकांच्या समुहाने या मंदिरावर अचानक हल्ला केला. या हल्लेखोरांनी मंदिराच्या मुख्य दरवाजासह अन्य दरवाजे आणि पायऱ्यांची तोडफोड केली. 

Related Stories

चीन ‘जे-20’ लढाऊ विमान आणखीन भक्कम करण्याच्या तयारीत

Patil_p

ब्राझील : संसर्ग पुन्हा तीव्र

Omkar B

अफगाणिस्तानात जाणवले भूकंपाचे धक्के

Patil_p

बांगलादेशातील टाळेबंदी संपुष्टात

Patil_p

ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा खात्मा

datta jadhav

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन तीव्र

Patil_p
error: Content is protected !!