Tarun Bharat

पाकिस्तान : व्हॅन नदीत कोसळून 17 ठार

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नदीत प्रवासी व्हॅन नदीत कोसळून 17 प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 16 सदस्यांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबाने व्हॅन भाड्याने घेतली होती. ही व्हॅन चिलास शहरातून रावळपिंडीला जात होती. कोहिस्तान जिल्ह्यातील पनिबा भागात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन सिंधू नदीत पडली. यात चालकासह 17 जणांचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू केला. पण जोराचा पाऊस आणि खोल नदीमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते.

Related Stories

फिनलंड, स्वीडनकडून नाटोसाठी अर्ज

Patil_p

पाकिस्तानात महिला पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

datta jadhav

ईशान्येतील उग्रवादाला मोठा दणका

Patil_p

पॉझिटिव्ह आल्यावर महिन्याने दुसरी चाचणी व्हावी

Patil_p

‘या’ भागात केवळ महिलांचेच राज्य

Patil_p

सीमेवर स्थैर्य असल्याचा चीनचा दावा

Patil_p