Tarun Bharat

पाकिस्तान सीमेजवळ मिग-21 कोसळले

नियमित उड्डाण करताना जैसलमेरमध्ये दुर्घटना

बेळगाव

राजस्थानमधील जैसलमेरजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जेट पडलेले ठिकाण जैसलमेरपासून 70 किमी अंतरावर असून ते सुदासरी डेझर्ट नॅशनल पार्क आणि पाकिस्तान सीमेजवळ आहे. हा परिसर लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे तेथे कोणालाही जाऊ दिले जात नाही. नियमित उड्डाणादरम्यान ही दुर्घटना घडली असून पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये बाडमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले होते. 

Related Stories

गाय मारु नका ः मुस्लीम धर्मगुरुंचे आवाहन

Patil_p

तंगधर परिसरात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला

datta jadhav

संजय राऊत ईडीच्या ताब्यात

Patil_p

सार्वजनिक ठिकाणी ड्रेसकोड लागू होतोच!

Patil_p

शेतकरी आंदोलक आज ‘जंतर-मंतर’वर

Patil_p

पाक सैन्याकडून पुंछ सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा

prashant_c
error: Content is protected !!