Tarun Bharat

पाक-इंग्लंड पहिली कसोटी आजपासून

लिव्हिंगस्टोनचे कसोटी पदार्पण, इंग्लंडच्या खेळाडूंना संसर्ग, सामना लांबणीवर पडण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ रावळपिंडी

इंग्लंडचा क्रिकेट संघ पाकच्या दौऱयावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला येथे गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली असून लियाम लिव्हिंगस्टोनचे कसोटी पदार्पण राहील. मात्र, इंग्लंडच्या खेळाडूंना विषारी किटाणूचा दणका बसल्याने कदाचित ही पहिली कसोटी लांबणीवर टाकण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.

या मालिकेतील उर्वरित दोन सामने मुल्तान आणि कराची येथे खेळविले जाणार आहेत. 2005 नंतर पहिल्यांदाच इंग्लंड आणि पाक यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. इंग्लंड संघाने अलीकडेच पाकचा दौरा केला होता. या दौऱयामध्ये सात सामन्यांची टी-20 मालिका खेळविली गेली होती. आगामी कसोटी मालिका ही आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत राहील. विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील पुढील वषी होणाऱया अंतिम सामन्यासाठी पाकचा संघ ही कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचे अकरा खेळाडू जाहीर केले असून 29 वषीय अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोनचा यामध्ये समावेश आहे. ऍलेक्स लिसच्या जागी डकैतला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडच्या टी-20 संघामध्ये लिव्हिंगस्टोनचा समावेश असतो. पण त्याची फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी या कसोटी मालिकेत दर्जेदार होईल, या अपेक्षेने इंग्लंडच्या निवड समितीने त्याला कसोटी संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील दुसरी कसोटी 9 ते 13 डिसेंबर दरम्यान कराचीत तर तिसरी आणि शेवटची कसोटी 17 ते 21 डिसेंबर मुल्तानमध्ये होणार आहे.

इंग्लंड संघ- क्रॉले, डकैत, ऑलि पॉप, रुट, बुक, बेन स्टोक्स (कर्णधार), फोक्स, लिव्हिंगस्टोन, लिच, रॉबिनसन आणि अँडरसन.

खेळाडूंना संसर्ग

पहिली कसोटी गुरुवारपासून सुरू होणार असल्याने इंग्लंड संघातील खेळाडूंनी बुधवारी बराच वेळ सराव केला. या सरावादरम्यान कर्णधार स्टोक्ससह संघातील बऱयाच खेळाडूंना विषारी किटाणूंचा प्रादुर्भाव झाला. या समस्येमुळे माजी कर्णधार रुटसह अन्य पाच खेळाडूंची तब्येत बिघडली आहे. या समस्येमुळे कदाचित रावळपिंडीच्या कसोटीला विलंब होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. यासंदर्भात पाक आणि इंग्लंड क्रिकेट मंडळामध्ये चर्चा सुरू आहे. इंग्लंड संघातील खेळाडू पूर्ण तंदुरुस्त असतील तरच ही कसोटी वेळेवर सुरू होईल, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.

Related Stories

क्रीडा विषयाचा समावेश दिक्षा ऍपमध्ये होणार

Patil_p

मिताली, अश्विनची खेलरत्नसाठी शिफारस

Patil_p

गुप्टिल मेलबर्न रेनेगेड्सशी करारबद्ध

Patil_p

किरण जॉर्ज, मालविका बनसोड उपांत्य फेरीत

Patil_p

माजी टेबलटेनिसपटू व्ही. चंद्रशेखर यांचे कोरोनाने निधन

Patil_p

बांगलादेशची टी-20 मालिकेत बरोबरी

Patil_p