Tarun Bharat

पाक संसदेचे नियंत्रण तिसऱ्या शक्तीच्या हातात

Advertisements

नवाज शरीफ यांचा सैन्यावर पुन्हा निशाणा

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्ष स्वरुपात देशाच्या सैन्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानची संसद आणि सरकार कुठली तिसरी शक्ती चालवत असल्याचे शरीफ यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे.

2014 मध्ये आयएसआयचे प्रमुख राहिलेले लेफ्टनंट जनरल जहिर उल इस्लाम यांनी मला राजीनामा देण्यास सांगितले होते, असा खुलासा नवाज यांनी केला आहे. राजीनामा न दिल्यास गंभीर परिणाम होतील. देशात मार्शल लॉ देखील लागू केला जाऊ शकतो असे आयएसआयकडून धमकाविण्यात आले होते. आयएसआयच्या धमकीला मी त्याच्या भाषेत प्रत्युत्तर दिले होते. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मी राजीनामा देणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते, अशी माहिती शरीफ यांनी दिली आहे.

सैन्य ठरतेय लक्ष्य

इम्रान खान सरकारला सैन्याचा पाठिंबा असल्यामुळेच ते आतापर्यंत टिकल्याचे नवाज शरीफ चांगलेच ओळखून आहेत. पाकिस्तानच्या संसदेत कुठल्या मुद्दय़ांवर चर्चा होणार आणि कोणती विधेयके मंजूर होणार हे तिसरी शक्तीच सरकारला सांगत असल्याचे शरीफ म्हणाले.

मरियमही आक्रमक

पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल बाजवा यांनी काही दिवसांपूर्वी गिलगिट-बाल्टिस्तानला स्वतंत्र प्रांत म्हणून दर्ज देण्याच्या प्रस्तावावर चर्चेसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलाविले होते. या बैठकीनंतर नवाज यांच्या कन्या आणि पीएमएल-एनच्या उपाध्यक्षा मरियम यांनी राजकारणाशी संबंधित मुद्दे किंवा कायदेशीर विषय संसदेतच निश्चित व्हावेत, सैन्यमुख्यालयात यावर चर्चा का केली जातेय असे म्हटले होते.

Related Stories

शीख नौसैनिकाला पगडी परिधान करण्याची अनुमती

Patil_p

चीनच्या आक्रमणवादावर अमेरिकेची टीका

Patil_p

4.7 रिश्टर स्केलचा नेपाळमध्ये भूकंप

Patil_p

अंतराळात पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचे पुरावे

Patil_p

12 वर्षाखालील मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरू

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 80 लाखांचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!