Tarun Bharat

पाक समर्थनार्थ घोषणा : निष्पाप लोकांना अटक: एसडीपीआय

बेंगळूर/प्रतिनिधी

दक्षिण कन्नड जिल्ह्याती बेलथांगडी तालुक्यातील उजीरे येथे ३० डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणी प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक केली आहे. पण पोलिसांनी निष्पाप लोकांना अटक केली असल्याचा आरोप सोशल सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एसडीपीआय) शुक्रवारी केला.

एसडीपीआयचे राज्य सचिव अशरफ मचार यांनी पत्रकारांशी बोलताना मध्यरात्री तीन पक्ष कार्यकर्त्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर पाकिस्तान समर्थक घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. त्यांनी दावा केला की एसडीपीआय सदस्य पाकिस्तानच्या बाजूने नव्हे तर पक्ष समर्थक घोषणा देत होते. ते म्हणाले, फक्त भाजप आणि संघ परिवारातील नेते नेहमीच किस्तानबद्दल बोलतात.

मुस्लिम समुदायाचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर पोलिसांनी एसडीपीआयच्या १५ कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. खासगी वाहिनीच्या मदतीने जातीयवादी मानसिकता असणार्‍या काही लोकांनी व्हिडिओवर डॉक्टोरिंग केल्याचा आरोप मचार यांनी केला.

Related Stories

मुख्यमंत्री बोम्माईंनी अर्थमंत्री सीतारमण यांची घेतली भेट; जीएसटी भरपाईची मुदत ३ वर्षांसाठी वाढवण्याची केली मागणी

Archana Banage

वाळू तस्करी विरोधात तक्रार केली म्हणून पोलिसांकडून तरुणाला मारहाण

Tousif Mujawar

२०२१ मध्ये कर्नाटक विधानसभेचे पहिले अधिवेशन आजपासून

Archana Banage

बीएमआरसीएलचे कोविड केअर सेंटर सुरू; १७ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु

Archana Banage

सेक्स सीडीमधील महिलेशी संबंध नाही: माजी मंत्री डी. सुधाकर

Archana Banage

अत्याचार प्रकरणी 12 आरोपींविरुद्ध 1,019 पानी चार्जशीट

Amit Kulkarni