Tarun Bharat

पाक सुपर लीग स्पर्धेतून नसीम शहाची हकालपट्टी

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पुढील महिन्यात अबु धाबीत पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धा खेळविली जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेत भाग घेणारा 18 वर्षीय नसीम शहाने स्पर्धेच्या कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याने त्याची या स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. नसीम शहाचे सोमवारी लाहोरमध्ये आगमन झाले. लाहोरमधील एका हॉटेलमध्ये शहाच्या संघाची राहण्याची सोय करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी पाकचे सर्व खेळाडू बुधवारी अबु धाबीला प्रयाण करणार आहेत. तत्पूर्वी या सर्व खेळाडूंची 48 तास अगोदर कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. पण शहाने 18 मे रोजी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल सादर केल्याने त्याची पाक सुपर लीग स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन न केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे

Related Stories

कोव्हिडच्या अस्मानी संकटात विंडीज संघ इंग्लंडमध्ये दाखल

Patil_p

गुजरात टायटन्सचे आयपीएलमध्ये विजयी पदार्पण!

Patil_p

अमेरिकेची ऍथिंग मू 800 मीटर्समध्ये विजेती

Patil_p

न्यूझीलंडच्या सोधीचा आगळा विक्रम

Patil_p

कोरोनाच्या पाचव्या चाचणीत पाक संघ पास

Patil_p

यू-19 विश्वचषक : भारत-जपान लढत आज

Patil_p