Tarun Bharat

पाचगणीत वीज पडून अश्वाचा मृत्यू

कुडाळ / प्रतिनिधी :    

पाचगणी येथे पडलेल्या अवकाळी पावसात टेबल लँडवर चरण्यासाठी गेलेल्या घोड्यावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. निलेश रमेश मोरे (रा. गोडवली ता. महाबळेश्वर) यांच्या मालकीचा हा घोडा होता, त्यांचे एक लाख तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

निलेश मोरे यांचा घोडा टेबल लँडवर चरत होता. त्यावेळी घोड्याच्या अंगावर वीज पडली. टेबल लँडवर गुरे चारत असलेल्या गुरख्यांनी याची माहिती घोडे व्यावसायिकास दिली. त्यानंतर त्वरित महसूल विभागाने घटनास्थळी येऊन एक लाख तीस हजार रुपये नुकसानीचा पंचनामा केला तर पशुवैधकीय अधिकारी फाटक यांनी शवविच्छेदन करून घोडा वीज पडून मृत्यू झाल्याचे सांगितले.

Related Stories

रिक्षा संघटनांची आरटीओ कार्यालयासमोर धरणे

Patil_p

परप्रांतीय मुकेशचा आणखी एक कारनामा समोर

Patil_p

अतिदक्षता विभागात आवश्यक औषधांसह अन्य बाबींवर निधी खर्च करण्याचा निर्णय

Patil_p

नागरिकत्व कायद्याविरोधात कराडला भव्य मार्चा

Patil_p

पालकमंत्र्याचे पाकीट मारणारा चोरटा पकडला

datta jadhav

यात्रेकरूंना सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देऊ

Patil_p