Tarun Bharat

पाचगावचे ग्रामसेवक स्वॅब द्या सांगून दमले….

मात्र पगार घेताना का नाही दमले ? – ग्रामस्थांचा सवाल

वार्ताहर / पाचगाव

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील लोकांना स्वॅब द्या असे सांगून सांगून आपण दमलो असल्याचे पाचगावचे ग्रामसेवक एस एम लंबे यांनी सांगितले. मग पगार घेताना आपल्याला का दम लागत नाही ?असा सवाल पाचगाव ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

पाचगाव मध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. पाचगाव मधील कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढतच आहे. या वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी दक्षता कमिटी सक्षम असणे गरजेचे आहे . पाचगाव चे लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील व प्रशासनातील मोजक्याच घटकांकडून पाचगाव मधील कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत . दक्षता कमिटी मधील सर्वांनीच कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाचगाव मध्ये अनेक पॉझिटिव्ह रुग्ण खुलेआम फिरत आहेत. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पाचगाव मध्ये एखाद्या रुग्णाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या संपर्का मधील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा स्वॅब घेणे गरजेचे आहे.

मात्र पाचगावमध्ये एखादा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या घरातील कोणत्याही सदस्यांकडे प्रशासनातील कोणीही लक्ष देत नाही वा त्याची विचारपूसही करत नाही, असे चित्र समोर आले आहे .यासंदर्भात ग्रामसेवक एम एस लंबे त्यांना विचारले असता आपण ग्रामस्थांना स्वॅब द्या द्या असे सांगून दमलो असल्याचे त्यांनी सांगितले. असे दमलेले ग्रामसेवक पाचगावमध्ये असतील तर पाचगावची रुग्ण संख्या कशी कमी होणार. जर हे ग्रामसेवक दमले असतील तर त्यांनी विश्रांती घ्यावी आणि दुसऱ्या चांगल्या ग्रामसेवकांना पाचगाव मध्ये काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी पाचगाव ग्रामस्थांमधून होत आहे.

कोरोना च्या दुसऱ्या लाटेत पाचगाव मध्ये सोमवार पर्यंत एकूण 571 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत यापैकी 17 रुग्ण मरण पावले आहेत.56 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत पाचगाव मध्ये एकूण 131 एक्टिव रुग्ण आहेत पाचगाव परिसरात दररोज सुमारे 15 ते 20 कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भरवशावर न राहता स्वतःची काळजी स्वतः घ्यावी अशी अपेक्षा सुज्ञ ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

ॲम्बुलन्स चालकांकडून लूट

पाचगाव ते कसबा बावडा या सुमारे दहा किलोमीटर अंतरासाठी पाचगाव येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडून ॲम्ब्युलन्स चालकाने अडीच हजार घेतले आहेत . ॲम्बुलन्स चालकांच्या लूटीला आळा कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाचगाव कळंबा मोरेवाडी साठी ॲम्बुलन्स ची मागणी

पाचगाव कळंबा मोरेवाडी परिसरात पूर्ण पॉझिटिव रुग्णांची संख्या जास्त आहे या रुग्णांना कोरोना केअर सेंटर मध्ये हलविण्यासाठी कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ॲम्बुलन्स ची मागणी केली आहे मात्र अद्यापही ॲम्बुलन्स मिळालेली नाही – संग्राम पाटील सरपंच पाचगाव

पाचगाव मध्ये सर्वेक्षणासाठी 48 कर्मचारी कार्यरत

पाचगाव परिसरात करुणा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे टेस्ट करणे घरोघरी जाऊन आजारी ग्रामस्थांचा शोध घेणे या कामासाठी आशा सेविका अंगणवाडी कर्मचारी मदतनीस शिक्षक असे एकूण 48 कर्मचारी कार्यरत आहेत असे असतानाही अनेक पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील लोकांशी यापैकी २ ते ३ दिवस कोणीही संपर्क करत नाही.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संपर्क मोहिमेचे स्वागत

Archana Banage

नियमांचा भंग करत दांडीया तीन ठिकाणी कारवाई

Archana Banage

Kolhapur : सहकार क्षेत्रातील निवडणूक कामातून शिक्षकांना वगळा…

Abhijeet Khandekar

ग्रामीण सहकारी बँकांचे राज्यभरात संघटन करणार : समरजितसिंह घाटगे

Archana Banage

हातकणंगले तालुका कृषि निविष्टा विक्रेता संघटनेचे मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन

Archana Banage

खासगी मालकी तरीही निवडणूक

Archana Banage