Tarun Bharat

पाचगावमधील व्यक्ती टिंबर मार्केट परिसरातील कोरोना मृत महिलेच्या संपर्कात

पाचगाव/प्रतिनिधी


पाचगाव आर.के. नगर रस्त्यावरील हरी पार्क येथील एका नातेवाईकाच्या महिलेचा गूरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. ही महिला राजाराम चौक टिंबर मार्केट परिसरातराहत होती. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने हरी पार्क परिसर निर्जंतुकीकरण करून घेतला आहे.

पाचगाव हरी पार्क येथील नातेवाईक टिंबर मार्केट परिसरात येत होता. या महिलेच्या संपर्कात हा नातेवाईक आला आहे. गूरूवारी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठी हरी पार्क परिसरातील काही नागरिक गेल्याचे समजते. हा व्यक्ती नेहमी टिंबर मार्केट परिसरात येत होता. त्याच्या संपर्कात परिसरातील अनेक नागरिक होते. या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आर.के.नगर येथील हायस्कूल मध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाचगाव मधील नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, नियमांचे पालन करावे असे आवाहन पाचगाव चे सरपंच संग्राम पाटील यांनी केली आहे.Related Stories

आंदोलन अंकुश, जयशिवराय संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

Archana Banage

बाजारपेठेत उडाली खरेदीसाठी झुंबड

Patil_p

धनदांडग्यांसाठीच महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष

Archana Banage

कोल्हापूर शहर परिसराला पावसाने झोडपले

Archana Banage

पोवई नाक्यावरचा रस्ता खचला; बांधकाम विभागाकडून मलमपट्टी सुरु

Archana Banage

वनडे मालिकेत न्यूझीलंडची विजयी सलामी

Patil_p