Tarun Bharat

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

प्रतिनिधी / ओरोस:

इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता 25 एप्रिलऐवजी 23 मे रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतही 10 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी इयत्तेत शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा आणि इयत्ता आठवीसाठीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी होणार किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत असतानाच या परीक्षा 25 एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. तर या परीक्षेला बसू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे 30 मार्चपर्यंत भरण्याची मुदत होती. दरम्यान 30 मार्चच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आदेशानुसार या परीक्षेच्या तारखेत बद्दल करण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार ही परीक्षा 23 मे रोजी होणार असल्याचे आंबोकर यांनी सांगितले.

Related Stories

देवगडमध्ये भाजपला धक्का, दोन नगरसेवक शिवसेनेत

NIKHIL_N

महाड दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू

Patil_p

पोषण आहार गोंधळामुळे पालक आक्रमक

Patil_p

देवबाग जिओ टय़ूब बंधाराप्रश्नी भाजप आक्रमक

NIKHIL_N

एकाच रुग्णवाहिकेचे दोन वेळा लोकार्पण

NIKHIL_N

राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे उभादांडा, नवाबाग, दाभोलीतील नुकसानग्रस्तांना ताडपत्रीचे वाटप

Anuja Kudatarkar