Tarun Bharat

पाचशे कोटी द्या, अन्यथा डाटा नष्ट करू

Advertisements

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करणाऱ्या हॅकर्सची धमकी

शासकीय पातळीवर कमालाची गुप्तता : तांत्रिक पातळीवर उपाययोजना करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

कोल्हापूर / संजीव खाडे

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) सर्व्हर हॅक करणाऱया हॅकर्सनी पाचशे कोटी रूपयांची मागणी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मागणी पूर्ण केली नाही, तर हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील सर्व महत्वाचा डाटा नष्ट करण्याची धमकीही हॅकर्सची दिल्याचे सांगितले जात आहे. हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत, या संदर्भात अजूनही माहिती उपलब्ध झाली नसली तरी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, तरुण भारत'नेएमआयडीसी’चा सर्व्हर हॅक’ या शीर्षकाखाली शनिवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राज्यातील उद्योजकांत खळबळ उडाली आहे. एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात उद्योजकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे.
गेल्या सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्याने राज्यातील मुंबईतील मुख्य कार्यालयासह सोळा प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे. एमआयडीसीशी संबंधित सर्व औद्योगिक वसाहती, त्यातील उद्योजक, संबंधित शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ऑनलाईन सिस्टिममुळे सर्व्हर आहे. हा ऑनलाईन डाटा सर्व्हर हॅक झाल्याने ओपन होत नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. संगणक ओपन केल्यास व्हायरस दिसत असून सिस्टिममध्ये प्रवेश केल्यास डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे एमआयडीसीने सर्व कार्यालयांना संगणक ओपन न करण्याच्या सूचना केल्या आहेत.

एमआयडीसीची आयटी टिम ऍक्टीव्ह

सर्व्हर हॅक झाल्यानंतर एमआयडीसीच्या सर्व कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. सिस्टिममध्ये व्हायरस शिरल्याने काम बंद आहे, असे अधिकारी, कर्मचारी उद्योजकांना सांगत आहेत. पण प्रत्यक्षात सर्व्हर हॅकर्सनी हॅक केल्याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळली जात आहे. हॅकींगवर मार्ग काढण्यासाठी तांत्रिक स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी आयटी टिम ऍक्टीव्ह झाली आहे.

हॅकर शोधण्याचे आव्हान

आयटीच्या जगतात जेवढा मोठा डाटा हॅक होतो, तो करणारा हॅकरही तितका तांत्रिकदृष्टÎा अव्वल असतो. एमआयडीसीकडे असणारा प्रचंड डाटा राज्यातील सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजकांशी संबंधित असणारा आहे. त्यामुळे तो हॅक करणारा हॅकर मोठा असण्याचीही शक्यता आहे. तशी शक्यता धरून हॅकर्सचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हॅकर्सना शोधण्यासाठी त्याने हॅक केलेल्या सिस्टिमचे डीकोडिंग करून शोध घ्यावा लागणार असल्याने आयटीतील तज्ञांची मदत घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाचशे कोटींची मागणी अन् धमकी

हॅकर्सनी एमआयडीसीकडे पाचशे कोटी रूपयांची मागणी केली असून ती पूर्ण केली नाही तर संपूर्ण डाटा नष्ट करण्याची धमकी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या धमकीबाबतही एमआयडीसीच्या राज्यातील सर्व कार्यालयात कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून अधिकारी तांत्रिक अडचण आल्याने सर्व्हर हँग झाल्याचे सांगत आहेत.

उद्योजकांत खळबळ

तरुण भारतने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर उद्योजकांनी एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱयांशी संपर्क साधून माहिती घेण्यास प्रारंभ केला. बऱयाच उद्योजकांची मार्च एंडिंगची कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. एमआयडीसीचा सर्व्हर बंद असल्याने एमआयडीशी संबंधित कामांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे वन विंडो सिस्टिम (एक खिडकी व्यवस्था) व ऑफलाईन सिस्टिमव्दारे कामे पूर्ण करण्यासाठी सुविधा देण्याची मागणी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निविदांवर परिणाम

एमआयडीसीने औद्योगिक विकासातील योजना आणि कामासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवडÎात या ऑनलाईन निविदा ओपन करण्यात येणार होत्या. यामध्ये मुंबई मेट्रो लाईनच्या महत्वाच्या कामाचाही समावेश आहे. पण सर्व्हर बंद पडल्याने या निविदा प्रक्रियेवर परिणाम होण्याचा धोका आहे.

एमआयडीसीच्या बंद सर्व्हर संदर्भात प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सिस्टिम पूर्ववत होण्यासाठी तीन, चार दिवस लागतील असे सांगितले. या काळात मार्च एंडिंग असल्याने उद्योजकांची गैरसोय होऊ नये, ासाठी ऑफलाईन काम आणि सिंगल विंडो सिस्टिम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूर

Related Stories

कळंबा तलाव भागवणार एप्रिलपर्यंतच तहान

Archana Banage

पाटण, वडूजसह सहा नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

Patil_p

कर्मचारी दर्जा नसलेल्या ग्रामपंचायत केंद्र चालकांना गगनबावडा तहसीलदारांचा कोविड कामासाठी नियुक्ती आदेश

Archana Banage

`सावित्रीबाई फुले’ मध्ये लवकरच हृदयरोग तपासणी विभाग

Archana Banage

फेसबुक पोस्ट करत नांदगावकरांनी ‘त्या’ चर्चांना दिला पूर्णविराम

datta jadhav

एक मत जास्त तरीही काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा पराभव

Archana Banage
error: Content is protected !!