Tarun Bharat

पाच एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर 24 तासात बदलला

अधिकाऱ्यांसह कळे उपविभागातील वीज कर्मचाऱ्यांची तत्परता

प्रतिनिधी /कोल्हापूर

कळे उपविभागांतर्गत पडळ कनिष्ठ अभियंता कार्यालयांतर्गत 5 एमीव्हीएचा ट्रान्सफॉर्मर अचानक बंद पडला. त्यामुळे पडळ परिसरातील अनेक गावे अंधारात गेली. दिवाळी सणाच्या कालावधीतच ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱयांची धावपळ सुरु झाली. खंडीत वीज पुरवठ्य़ामुळे ग्राहकदेखील हवालदिल झाले. याची गंभीर दखल घेत अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी तत्काळ ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ग्रामीण विभाग एकचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश पवार यांनी त्वरीत मंजूरी दिली. त्यामुळे अवघ्या चोवीस तासात पडळ परिसरातील वीज पुरवठा सुरळीत झाला.

पडळ येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याची माहिती समजताच कळे उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एस.पी. पाटणकर यांनी तत्काळ हालचाली सुरु केल्या. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अंधारात सापडलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी त्वरीत ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे प्रयत्न सुरु केले. वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून मंजूरी घेतली. केवळ 24 तासांत ट्रान्सफॉर्मर बदलून ग्राहकांना दिलासा दिला. कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे व सैन्य दलातील जवान श्रीकांत बावीचकर यांच्या हस्ते नवीन ट्रान्सफॉर्मर सुरु करून वीज पुरवठा सुरु केला. त्यामुळे पडळ परिसरातील नागरीकांनी महावितरणचे सर्व अधिकारी व वीज कर्मचाऱयांचे आभार मानले.

Related Stories

जिल्ह्यातील ९०० गावांच्या विकासासाठी एनडीएसोबत, खासदार संजय मंडलिक यांची भूमिका, तर माने कोल्हापुरात येऊन बोलणार

Rahul Gadkar

सुळंबी येथील १०४ वर्षाच्या आजीने कोरोनाला हरवले

Archana Banage

कोल्हापूर : वडगाव येथे ऊसतोड मजूर महिलेचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

Archana Banage

सतेज पाटील, खासदार मंडलीक यांची आमदार आबीटकर यांच्या निवासस्थानी भेट

Archana Banage

इचलकरंजी येथील मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक

Archana Banage

Kolhapur; वारणेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

Abhijeet Khandekar