Tarun Bharat

पाच टक्के सवलतीत मुदतवाढ ; मालमत्ताधारकांना दिलासा

प्रतिनिधी/ बेळगाव

घरपट्टीत करण्यात आलेली वाढ रद्द करावी तसेच पाच टक्के सवलतीची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. अखेर नगर विकास खात्याने कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाच टक्के सवलतीची मुदत वाढविले आहे. मालमत्ताधारकांना 31 जुलैपर्यंत पाच टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच  कर भरणा केला नसल्यास दि.1 नोक्हेबर पासून प्रति महिना दोन टक्के दंड वसुली करण्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने संपूर्ण देशात दोन महिन्यापासून लॉक डाऊन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के सवलत देण्यात येते. पण लॉक डाऊन मुळे नागरिकांना एप्रिल महिन्यात घरपट्टी करता आली नाही.अशातच महापालिकेने घरपट्टी 15 ते 25 टक्?क्?यापर्यंत वाढ केली आहे. तसेच कचरा व्यवस्थापन शुल्क दुप्पट आकारण्यात येत आहे. त्यामुळे घरपट्टी वाढ रद्द करावी आणि पाच टक्के सवलतीची मुदत वाढविण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत तरुण भारतने पाठपुरावा चालविला होता तसेच माजी महापौर सरिता पाटील आणि माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेऊन सध्या पाच टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामध्ये आता दि.31 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना दि.31 जुलैपर्यंत 5 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. यापुर्वी कर भरणा केला नसल्यास दि.1 जूलै पासून प्रति महिना  दोन टक्के दंड आकारणी करण्यात येत होती. पण आता दि.1 नोक्हेबर पासून प्रति महिना दोन टक्के दंड वसुली करण्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे. नगर विकास खात्याने पाच टक्के सवलतीची मुदत वाढविली असल्याने मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

कारमधील दहा लाख लांबविले

Amit Kulkarni

बेळगाव शहरासह तालुक्यात हुडहुडी

Amit Kulkarni

जिल्हय़ात कोरोनाचे 14 नवे रुग्ण

Patil_p

स्मशानभूमीतच महानगरपालिकेचे वाहनतळ

Omkar B

तलावातील गाळ शिवारात : 50 एकर शेतीचे नुकसान

Amit Kulkarni

रस्त्यांचे रुंदीकरण पार्किंगसाठी?

Amit Kulkarni