Tarun Bharat

पाच तालुक्यात एकही नवीन रुग्ण नाही

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

ऑक्टोबर महिन्यात हळूहळू करत मंदावत गेलेली वाढ गेल्या चार दिवसांपासून 50 च्या खाली राहिलेली असून यामध्ये गेली दोन दिवस पाच तालुक्यात एकही नवीन बाधित रुग्ण वाढ झालेली नसल्याची दिलासादायक स्थिती आहे. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, जावली, कोरेगाव तालुक्यात सलग दोन दिवस एक देखील नवीन रुग्ण वाढ नाही तर साताऱयात दोन अंकी उर्वरित पाच तालुक्यात अल्प एक अंकी वाढ समोर आलीय. मात्र, कोरोना स्थिती आता आटोक्यात येत असल्याने जिल्हय़ाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु झालीय.

दरम्यान, इंडियन कोव्हिड पोर्टलवरुन प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या अहवालात फक्त 36 जणांचा अहवाल बाधित आला तर शनिवारी कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, एका बाधिताच्या मृत्यूची  उशिरा नोंद करण्यात आलेली आहे. रविवारी सायंकाळी 142 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सक्रीय रुग्ण संख्येचा आलेख खाली

सप्टेंबर महिन्यापर्यंत व ऑक्टोबरचा आरंभ होताना देखील जिल्हय़ात सक्रीय रुग्ण संख्या 8 ते 10 हजारांच्या घरात होती. मात्र, बाधित वाढीचा वेग मंदावल्यानंतर हळूहळू सक्रीय रुग्ण संख्येचा आलेखही खाली घसरला असून आजमितीस जिल्हय़ात 537 बाधित रुग्ण सक्रीय आहेत. मात्र, त्यापैकी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 190 च्या आसपास रुग्ण उपचारार्थ असून उर्वरित रुग्ण होम आयसोलेट आहेत. आता यापुढे देखील कोरोनासमवेत काळजी घेत जगावे लागणार याची सवय नागरिक करुन घेत असून गर्दीत अपवाद सोडता सर्वजण नियम पाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

36 जणांचा अहवाल बाधित

शनिवारी रात्रीच्या अहवालानुसार आजचे व आजअखेर बाधित झालेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी आहे. सातारा 11 (51,961), माण 8 (17,967), खटाव 6 (25,863), कराड 4 (39,211), फलटण 2 (37,375), पाटण 2 (10,140), वाई 0 (15,756), महाबळेश्वर 0 (4,711), खंडाळा 0 (14,191), जावली 0 (10,035), कोरेगाव 0 (21,919), इतर 3 (2,173) असे एकूण 2,51,302 आजअखेर बाधित झालेल्याची संख्या आहे.

जिल्हय़ात लसीकरण 28 लाखांच्या पार

जिल्हय़ात लसीकरणाचा वेग थोडा मंदावलेला आहे. रविवारी फक्त 413 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत जिल्हय़ातील एकूण  28 लाख 28 हजार 908 नागरिकांनी घेतलेली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 63 हजार 730 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 65 हजार 178 एवढी दिलासादायक झालेली आहे.

Related Stories

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार

datta jadhav

अख्ख्या गल्लीची चाळण करुनही लिकेज सापडेना!

Abhijeet Shinde

नारायण राणेंच्या बंगल्यात महापालिका पथक दाखल

Abhijeet Shinde

पासार्डे येथे रेशन दुकानातून नियमापेक्षा कमी तांदूळ दिल्याने नागरिकांचा गदारोळ

Abhijeet Shinde

शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोधने सेनेने खाते खोलले

Patil_p

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी त्वरीत ऑनलाईन नोंदणी करावी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!