Tarun Bharat

पाच तासात मुद्देमालासह चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद

Advertisements

गुन्हे प्रकटीकरण पथकाची उल्लेखनीय कामगिरी

प्रतिनिधी / अक्कलकोट


अक्कलकोट शहरातील खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात एक भाविक कुटुंबासमवेत दि १८ रोजी सकाळी अभिषेक करत असताना गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या पिशवीतील पर्सवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून दोन मोबाईल फोन ५ हजार पाचशे रुपये असे ३५ हजार ५ शे रुपयांच्या मुद्देमाल लंपास केला होता.याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी संतोष वामन महाडेश्वर वय 64 राहणार रूम नं 42 बीडीडी चाळ नंबर 11 वरळी मुंबई यांच्या झालेल्या चोरीप्रकरणी पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो ह महादेव चिंचोळकर गजानन गायकवाड चिदानंद उपाध्ये यांना तपासकामी शोध घेत असताना अक्कलकोट बसस्थानक परिसरात एक संशयित व्यक्ती फिरत आहे. हे समजल्यानंतर तात्काळ संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता योगेंद्र प्रकाश लोके वय 41 रा. ए ३०१दोस्ती कोरल ४ स्टेला नवीन पेट्रोल पंपाजवळ बरामपुर वसई पश्चिम जिल्हा पालघर यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 5500 रोख रक्कम मिळून आला त्यानंतर सदर आरोपीस अटक करून तपास कामी अक्कलकोट न्यायालय येथे हजर करून त्याची पोलिस कोठडी घेतली असता आरोपीने पोलीस कोठडी दरम्यान ३० हजार रुपये किमतीचे २ मोबाईल फोन असा ऐवज काटेरी झुडपात लपवून ठेवला असल्याचे निदर्शनास आले.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो ह महादेव चिंचोळकर पो अंमलदार गजानन गायकवाड पो अंमलदार चिदानंद उपाध्ये यांनी सदर गुन्ह्याचा व आरोपीचा तपास अवघ्या पाच तासात लावून मुद्देमालासह आरोपीस जेरबंद केल्याने पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्याकडून तिघांचा यथोचित सन्मान करून रोख बक्षीस देण्यात आले.

Related Stories

सोलापुरातील युवा कलाकाराने साकारली भव्य दुर्गा देवीची प्रतिमा

Abhijeet Shinde

तहसिलदार मॅडमही हिरॉईनसारख्याच दिसतात…

prashant_c

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात आरोग्याचा महायज्ञ

Sumit Tambekar

सोलापुरात हिजाबच्या समर्थनार्थ ‘एक नारी सब पे भारी’ मुस्लीम महिलांचा जयघोष

Sumit Tambekar

विसावा नव्हे पंढरपूरपर्यंत 40 वारकऱ्यांच्यासह पायी जाण्याचा आग्रह : प्रशासनाशी चर्चा

Abhijeet Shinde

निधीअभावी शहरातील प्रकल्प रखडणार नाहीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!