Tarun Bharat

पाच पालिकांचा आज निकाल

दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

प्रतिनिधी / पणजी

पाच पालिकांच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवार दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. पासून सुरु होणार असून दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. म्हापसा, मुरगांव, मडगांव, सांगे व केपे या पाच पालिकांसाठी शुक्रवारी मतदान झाले आहे. सुमारे 66 टक्के मतदान झाले. तसेच कारापूर सर्वण व वेळ्ळी या पंचायतींच्या दोन जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचा निकालही आज लागणार आहे.

आज सकाळी 8 वा. त्या त्या पालिका क्षेत्रातील मतमोजणी केंद्रात मतपेटय़ा उघडल्या जाणार असून मतमोजणी सुरु होणार आहे. मतपत्रिकांची मोजणी असल्याने एकंदरित निकाल येईपर्यंत दुपार होईल, असा अंदाज आहे.

त्या पाच पालिकांच्या निकालाकडे तेथील मतदार – उमेदवार तसेच स्थानिक आमदारांचे लक्ष लागून राहिले आहे. त्या पाच पालिका भाजपा व सरकार विरोधी कौल देतात की सरकारच्या बाजूने ते महत्त्वाचे ठरणार आहे. त्यावर पुढील राजकारण रंगणार आहे. भाजप पुरस्कृत उमेदवारांचा विजय होणार असल्याचा दावा भाजपचे नेते करीत आहेत तर त्यांचा पराभव होणार असल्याचे भाकीत विरोधी पक्षांनी केले आहे.

मागील मार्च महिन्यात झालेल्या पणजी मनपासह एकूण 7 पालिका निवडणुकीतील 6 पालिकेत भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी ठरले होते. पालिका निवडणूक प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे या पाच पालिका निवडणुका मागे राहिल्या व उशिराने घ्यावा लागल्या. तेथे मतदार राजा विरोधकांना कौल देतो की सत्ताधाऱयांना याचा निकाल आज लागणार आहे.

Related Stories

काँग्रेसच्या स्थिर सरकारासाठी मडगावकरांची भूमिका निर्णायक

Amit Kulkarni

मद्यधुंद तरुणांच्या गटाकडून होंडा येथे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱयाला मारहाण

Amit Kulkarni

पहिल्या खाण लिलावात वेदांताची बाजी

Patil_p

कोलवाळातील कैदी संपावर

tarunbharat

‘विश्वजीत फडते’ झळकणार फौलाद खानाच्या भूमिकेत

Amit Kulkarni

सांगे आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका, वॉटर कूलर

Amit Kulkarni