Tarun Bharat

पाच राज्यातील निवडणूक लांबणार?

Advertisements

नवी दिल्ली

येत्या एप्रिल-मेमध्ये पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुका काही आठवडय़ांपर्यंत पुढे जाऊ शकतात. कोरोनाची छाया अजूनही गडद असल्यामुळे आणि शालेय परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही व्यत्यय टाळण्यासाठी विधानसभा निवडणुकीचे मतदान काही आठवडय़ांनी लांबणीवर पडू शकते.

कोरोना विषाणू संसर्गामुळे अद्याप शालेय परीक्षांच्या तारखा अनिश्चित असल्यामुळे विधानसभा निवडणुकीची तारीख ठरवताना निवडणूक आयोगाची कसोटी लागणार आहे. तारखा निश्चित करण्यासाठी आतापासूनच निवडणूक आयोगाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जाहीर केल्या जाऊ शकतात. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पाँडिचेरी या राज्यांमध्ये यावषी एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नियोजन पेले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय सुरक्षा दलाची उपलब्धता आणि आवश्यकता यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांच्याशी निवडणूक आयोगाने मंगळवारी चर्चा केली आहे.

निवडणूक आयुक्तांचा दौरा निश्चित

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा पुढील आठवडय़ात आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही निवडणूक आयुक्त सुशीलचंद्र आणि राजीव कुमार यांच्यासमवेत दोन्ही राज्यांचा दौरा करतील. अधिकाऱयांना भेटण्यासाठी उपनिवडणूक आयुक्त सुदीप जैन यापूर्वीचा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले असून त्यांचा हा पश्चिम बंगालचा दुसरा दौरा आहे. आसाममधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आणखी एक अधिकारी पाठविण्यात आला आहे. येथे एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित आहे.

Related Stories

भारताचा विकासदर येणार 2.8 टक्क्यांवर

prashant_c

तृणमूल काँग्रेसचे रतन टाटांना साकडे

Patil_p

ट्रम्प यांना पाठवला ‘विषारी’ लिफाफा

Patil_p

संत रामानुजाचार्यांनी जातीभेद संपवला!

Patil_p

‘कनौज’समोर आसामचा चहाही फिका

Patil_p

दिल्ली : कोरोना रुग्णांनी ओलांडला 5.51 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar
error: Content is protected !!