Tarun Bharat

पाटणच्या नगरसेवकाकडून अश्लिल चित्रफित व्हायरल

Advertisements

प्रतिनिधी/ नवारस्ता

’पाटण प्रेस’ नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाटण नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱया  शिक्षकानेच ग्रुपवर एक अश्लील व्हीडिओ व्हायरल करून आपल्या विकृत वृत्तीचे प्रदर्शन केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिह्यात खळबळ उडाली आहे.

    ‘पाटण प्रेस’ या नावाने असलेल्या व्हॉट्सअप ग्रुप हा सर्व प्रतिष्ठित पत्रकार, काही वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी तसेच अनेक मान्यवर लोक असलेला व्हॉट्सअप ग्रुप आहे. यामध्ये तालुक्यातील आजी माजी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह माजी आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, माजी तहसीलदार, वनाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, डॉक्टर, शिक्षक यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे वरिष्ठ आणि जबाबदार पत्रकार तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील जबाबदार सुज्ञ नागरिक असे मिळून तब्बल 254 जण आहेत. या ग्रुपवर अनेक चांगल्या बातम्या व लोकोपयोगी बाबी पाठविल्या जातात व चर्चा केली जाते. शिवाय या ग्रुपवर महिला व महिला अधिकारीही आहेत. त्यामुळे हा व्हॉट्सअप ग्रुप हा खुप प्रतिष्ठित व जबाबदार लोकांचा आहे.

 मात्र 15 रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास याच ग्रुपमधील पाटण मधील एका नामांकित शाळेतील क्रीडाशिक्षक आणि पाटण नगरपंचायतीचा माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक याने एक अश्लील व्हीडिओ व्हायरल केला. अचानक घडलेल्या या धक्कादायक आणि घृणास्पद प्रकारामुळे एवढा मोठा प्रतिष्ठित ग्रुप अवाक झाला. काही वेळ कुणालाही काही सुचेनासे झाले. तरीही काहींनी तत्काळ ग्रुपवर या घृणास्पद बाबीचा निषेधही केला आणि संबंधित नगरसेवकाला तातडीने तो व्हीडिओ डिलीट करण्याच्या सूचना दिल्या. पाटणचे प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह ग्रुपमधील अनेक जण त्याच क्षणी म्हणजे 15 रोजी सायंकाळी 4.43 वाजण्याच्या दरम्यान लेफ्ट झाले आणि सुमारे वीस मिनिटे ग्रुपवर असलेली व्हीडिओ क्लिप जिल्हाभर व्हायरल झाली आणि संपूर्ण जिह्यात संबंधित नगरसेवकाच्या विकृतवृत्तीने एकच खळबळ उडाली.

     सदरचा नगरसेवक हा पाटण तालुक्यातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत शारीरिक शिक्षक म्हणून नोकरीस आहे. त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशी मानसिक विकृती अतिशय धोकादायक ठरू शकते. याचा गंभीर आणि मानसिक परिणाम शिक्षण घेणाऱया मुलांवर विशेषतः मुलींवर आणि महिला पालकवर्गावर  होऊ शकतो. त्यामुळे अशा विकृत मनोवृत्ती असलेल्या व्यक्तिबद्दल पाटण शहरातील व तालुक्यातील महिलांमध्येच नव्हे तर संपूर्ण सातारा जिह्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याने जिह्यात खळबळ उडाली आहे.

Related Stories

सातारा : पालिकेत विषय समितीच्या सभापती निवडी बिनविरोध

datta jadhav

नागठाणेच्या सरपंचपदी डॉ. रुपाली बेंद्रे

datta jadhav

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नौटंकी ; नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Abhijeet Shinde

अनिल देशमुखांचा CBI कोठडीतला मुक्काम वाढला

datta jadhav

Vedanta & Foxconn :”मोदी ने क्या दिया? लॉलीपॉप लॉलीपॉप” म्हणत पुण्यात, मुंबईसह कोल्हापुरात विरोधकांकडून आंदोलन

Archana Banage

मान्सून २ दिवसांत राज्यात धडकणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!