Tarun Bharat

पाटणामध्ये ट्रेनने कारला दिली धडक; एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पाटणा : 


बिहारमधील पाटणा जिल्ह्यात शनिवारी एक कार ट्रेनच्या खाली आल्याने चार वर्षाच्या मुलासमवेत एकाच परिवारातील तीन जणांचा मृत्यू झाला. 


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाटणा मधील पुनपुनमध्ये रेल्वे क्रॉसिंग जवळ झाली. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी सांगितले की, कार सकाळी 6.35 च्या दरम्यान पोटही आणि नदवां स्टेशन दरम्यान रेल्वे रुळ ओलांडत होती. त्याच वेळी पाटणा – रांची जनशताब्दी विशेष ट्रेनने या कारला धडक दिली. 


हा अपघात कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे असे सांगून ते म्हणाले, या कार चालकाने बेकायदेशीरपणे रेल्वेचे रूळ ओलांडून नियमांचे उल्लंघन केले. ही ट्रेन गया येथे जात असताना हा अपघात घडला. 


पुनपुन पोलीस स्टेशनचे एसएचओ कुंदन कुमार सिंह यांनी सांगितले की, मृतांमधील सुजित (वय 32) आणि त्यांची पत्नी नीलिमा (वय 26) यांची ओळख पटली आहे. यांच्या चार वर्षांच्या मुलाचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. पुढे ते म्हणाले, हे कुटुंब पाटणा मधील आनंदपुरी या भागातील रहिवासी होते. दरम्यान, मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. 

Related Stories

सावित्रीबाई फुले यांचा काँग्रेसला रामराम

Patil_p

काश्मीरमध्ये हिंदू बँक मॅनेजरची हत्या

Amit Kulkarni

नेताजींचे स्वप्न पूर्ण करतोय संघ

Patil_p

KOLHAPUR AIRPORT- आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमाची अंमलबजावणी

Rahul Gadkar

आदिवासी महिलेचा छळवाद करणाऱ्या सीमा पात्राला अटक होताच पहिली प्रतिक्रिया

Archana Banage

ऑनलाईन वर्ग सुरू झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होणार

datta jadhav