Tarun Bharat

पाटणा पायरेट्स यू मुम्बाला धक्का

Advertisements

गुजरात जायंट्सकडून टायटन्सचा धुव्वा, राकेशची चमक

वृत्तसंस्था/ बेंगळूर

राकेशच्या पुन्हा एकदा चमकदार प्रदर्शनाच्या जोरावर गुजरात जायंट्सने प्रो कबड्डी लीगमधील सामन्यात तेलुगू टायटन्सचा 40-22 असा धुव्वा उडविला तर दुसऱया सामन्यात पाटणा पायरेट्सने फॉर्ममध्ये असलेल्या यू मुम्बाचा 43-23 असा एकतर्फी पराभव केला.

गुजरातच्या राकेशने सुपर 10 (एकूण 16 गुण) तर परवेश भैन्सवालने 4 टॅकल गुण मिळविले. तेलुगू टायटन्सच्या बचावफळीत नेत्याचा अभाव जाणवत होता. त्यांचा रायडर रजनीशने आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करीत 12 गुण मिळविले. या संघाला या मोसमात अद्याप एकही विजय मिळविता आलेला नसल्याने गुणतक्त्यात ते तळाच्या स्थानावर आहेत.

गुजरातने अनुभवी कॉर्नर जोडी रविंदर पहल, गिरीश एर्नाक यांच्याशिवाय खेळाला सुरुवात केली. अनुभवी रायडर रोहित कुमार व सिद्धार्थ देसाई यांच्याशिवाय खेळणाऱया टायटन्सने संदीप कंडोलासही स्टार्टिंग लाईनअपमध्ये घेतले नाही. त्याच्या जागी युवा मुहम्मद शिहासला खेळविण्यात आले. डिफेन्समध्ये अनेक बदल झाले असल्याने पूर्वार्धात साहजिकतच रायडर्सनी वर्चस्व गाजविले. 8 व्या मिनिटाला गुजरातच्या राकेशने पहिल्या सुपररेडमध्ये 3 गुण मिळविले आणि पूर्वार्ध संपण्यास आठ मिनिटे असताना त्यांनी टायटन्सला ऑलआऊट करीत 7 गुणांची आघाडी घेतली. टायटन्ससाठी रजनीशने रेडपॉईंट मिळविण्याचा सिलसिला चालू ठेवला होता. पण इतरांकडून त्याला फारशी साथच मिळाली नाही. राकेशने मध्यंतराच्या सुमारास डुबकी करीत 3 गुणांचा सुपररेड मिळविला. त्याने सुपर 10 मिळवित मध्यंतराला गुजरातला 20-13 अशी आघाडी मिळवून दिली.

या सत्रात टायटन्सने फक्त एक यशस्वी टॅकल केले. राकेश व महेंद्र राजपूत यांनी रेडपॉईंट घेत गुजरातची आघाडी वाढवत नेली. टायटन्ससाठी रजनीशने सुपर टेन मिळविले. पण रतन के.ने सुपर टॅकल व रेडपॉईंट मिळवित बरोबरी साधली. गुजरातच्या परवेशने सुपर टॅकल मिळविल्यानंतर सामना संपण्यास 5 मिनिटे असताना त्यांनी 11 गुणांची आघाडी घेतली होती आणि शेवटच्या मिनिटाला ऑलआऊट करीत या मोसमातील दुसरा विजय निश्चित केला.

पाटणाचे शानदार प्रदर्शन

पाटणा पायरेट्सच्या समतोल संघाने फॉर्ममध्ये असलेल्या यू मुम्बाचा तब्बल 20 गुणांच्या फरकाने पराभव केला. पहिल्या मिनिटापासूनच पाटणाने वर्चस्व ठेवले आणि त्यांचे डिफेंडर्स नीरज कुमार व मोहम्मदरेझा शादलोइ यांनी शानदार प्रदर्शन केले. त्यांच्या सर्वच खेळाडूंनी या विजयात मोलाचा वाटा उचलल्याने गुणतक्त्यात त्यांनी आघाडीचे स्थान पटकावले. मुंबईला त्यांचा स्टार रायडर अजित कुमारची उणीव भासली. रायडर्समध्ये आत्मविश्वासाचा अभाव आणि डिफेंडर्स फझल अत्राचली व ंिरंकू यांच्याकडून झालेल्या चुकांचाही मुंबईला फटका बसला. 6 व्या मिनिटाला पाटणाने त्यांना ऑलआऊट करीत 7 गुणांची आघाडी घेतली.

नंतर मुंबईसाठी आशिष सांगवानने सुपर टॅकल करीत आशा निर्माण केली. पण रायडर्सकडून त्याला पुरेशी साथ मिळाली नाही. पूर्वार्धातील शेवटच्या चढाईत सचिनने मुब्ंाईला ऑलआऊट केले, असे वाटले. पण रिंकूने एकटय़ाने सुपर टॅकल करीत मुंबईचे ऑलआऊट टाळले. पूर्वार्धात पाटणाने 19-9 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील पहिल्याच मिनिटाला पाटणाने मुंबईला ऑलआऊट केले. मोठी आघाडी घेतल्यानंतर पाटणाने चढाईमध्ये वेळ काढण्याचे धोरण अवलंबत मोठा विजय साकार केला.

आजचे सामने

1) बंगाल वॉरियर्स वि. तामिळ थलैवाज

वेळ ः रात्री 7.30 वा.

2) यू मुम्बा वि. पुणेरी पलटन

वेळ ः रात्री 8.30 वा.

थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने हॉटस्टार.

Related Stories

विंडीज क्रिकेटपटूंना सध्या निम्मे वेतन देण्याचा निर्णय

Patil_p

जसप्रित बुमराह टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर

Amit Kulkarni

सुवेद पारकरचे पदार्पणात शतक

Patil_p

एफआयएच समिती सदस्यपदी श्रीजेश

Patil_p

सैनीच्या दुखापतीची तपासणी

Patil_p

केएल राहुलला रोखण्याची पंजाब किंग्सची महत्त्वाकांक्षा

Amit Kulkarni
error: Content is protected !!