Tarun Bharat

पाठलाग करुन दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

वार्ताहर/ पुसेगाव

दरोडा टाकण्याच्या नादात असलेल्या टोळीला पुसेगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून मोटारसायकल, मोबईल, तलवारी व दरोडा टाकण्याचे साहित्य असा एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत पाच जणांना पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली. फलटण, बारामती भागातही मोठय़ा प्रमाणात चोऱया केल्याची माहिती या टोळीने पोलिसांना दिली आहे.

  विक्रम तुकाराम आगवणे (वय 28 वर्षे, रा. निंभोरे, ता. फलटण, जि. सातारा,) रविंद्र भरत शिरतोडे (वय 20 वर्षे, सद्या रा. बोरखळ, ता. जि. सातारा, मुळ रा. निंभारे, ता. फलटण) दीपक शंकर मदने (वय 19 वर्षे, रा. गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर,) आदित्य लाला जाधव (वय 20 वर्षे, रा. ठाकुरकी, ता. फलटण) राजेश बापूराव पाटोळे (वय 19 वर्षे, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयतीची नावे आहेत.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसापासून पुसेगाव व परिसरात  मोटारसायकल, घरफोडी, चोरीचे प्रकार वाढले होते. त्यावर तातडीने अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱहाडे, उपवभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी  पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करणेच्या सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत सपोनि संदिप शितोळे, सुनिल आबदागिरे, वैभव वसव, पुष्कर जाधव, उमेश देशमुख, अशोक सरक हे पेट्रोलींग करत असताना बुध (ता.खटाव) गावच्या हद्दीत राजापूर फाटा येथे काही संशयीत इसम उभे असलेचे दिसून आले. त्यांचेकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत शेताचे दिशेने पळू ल्यागल्याने त्यांच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते पाचही जण आले असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यांच्याकडून दोन प्लसर मोटारसायकल, दोन तलवारी, 5 मोबाईल, 1 स्क्रुडाव्हर, 1 पक्कड, 1 गज, व्हिलपाना असे दोराडा टाकण्याचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर संशयतानी फलटण, पुणे, बारामती, पाटस, बिगवण परीसरात चोऱया केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

  पाचही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी काही गंभीर गुन्हे या टोळीने केले आहेत का या बाबतचा अधिक तपास चालू असल्याचे सपोनि. संदिप शितोळे यांनी सांगितले.

Related Stories

नोकरीच्या अमिषाने 90 हजारांची फसवणूक

Patil_p

सचिन वाझे मातोश्रीवर दरमहिन्याला शंभर कोटी पाठवायचा; शिंदे गटाच्या खासदाराचा ठाकरेंवर गंभीर आरोप

Archana Banage

बारामतीत आयुर्वेदिक महाविद्यालयात पुढील वर्षापासून प्रवेश

datta jadhav

कोल्हापूर एमआयडीसी १६ मे पासून आठ दिवस राहणार बंद

Archana Banage

कोल्हापूर : मिणचे येथे दुचाकीची समोरासमोर धडक, जखमी युवकाचा मृत्यू

Archana Banage

सातारा जिल्ह्यात दुकाने रात्री 9 पर्यंत खुली राहणार

Archana Banage