Tarun Bharat

पाठय़पुस्तके वेळेत मिळण्याबाबत संभ्रम

1 जुलैपर्यंत पाठय़पुस्तके तयार होण्याबाबत साशंकता

प्रतिनिधी /बेळगाव

शाळा सुरू होण्याचा मुद्दा अद्यापही अधांतरीच राहिला आहे. सरकार 1 जुलैपासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्याबाबत विचार करत आहे. परंतु शिक्षण खाते त्याबाबत संभ्रमात आहे. 1 जुलैपर्यंत पाठय़पुस्तके तयार होण्याबाबत साशंकता असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्या आधारे शिकविले जाणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

शिक्षण खात्याच्या सूत्रानुसार पाठय़पुस्तके तयार करण्यासाठी अद्याप निविदा काढल्या नाहीत. पुस्तके तयार करण्यासाठी किमान 100 दिवसांचा कालावधी लागणार आहे. परंतु तेव्हढी प्रतीक्षा आम्ही करणार नाही. पुस्तके जशी तयार होतील तसे वितरण करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि छपाईचा वेग वाढवू, असे शिक्षण आयुक्त व्ही. अन्बुकुमार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. पहिल्या महिन्यात ब्रिजकोर्सवर भर असेल. म्हणजेच शिक्षक गतवषीच्या अभ्यासक्रमाची उजळणी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. निविदा 100 कोटीची असल्याने प्रक्रियासुद्धा मोठी आहे. दरम्यान कर्नाटक टेक्स्ट बुक सोसायटीने गटशिक्षणाधिकाऱयांना पत्र लिहून गतवषीची सुस्थितीतील पुस्तके जमा करण्याचा आदेश दिला आहे. पुस्तक बँकेसाठी त्याचा उपयोग होईल, असेही कळविले आहे. यंदा ग्राम पंचायत अंतर्गत ग्रंथालयांनीही पुस्तकांची मागणी केली आहे. अर्थात जुनी पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जाणार नाहीत, असे सोसायटीचे संचालक मादेगौडा यांनी स्पष्ट केले.

पुस्तकांच्या विलंबाबाबत शिक्षणतज्ञ नाराज आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थी फक्त पुस्तकांवर अवलंबून आहेत. पुस्तके लवकर मिळाल्याशिवाय अभ्यास करणे कठीण होणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

संगमेश्वरनगर परिसरात अंधाराचे साम्राज्य

Amit Kulkarni

मार्कंडेय नदी काठावरील भातशेती गेली वाया

Patil_p

एपीएमसी भाजी मार्केट टिकविणे ही सरकारची जबाबदारी

Amit Kulkarni

चोविस तास पाणी योजनेच्या विस्तारीकरणाचे काम वेळेत पूर्ण करा

Patil_p

हुबळी-दादर रेल्वे पाच दिवस रद्द

Patil_p

परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱयांचे वाढीव पेन्शनसाठी आंदोलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!