Tarun Bharat

पाडळीच्या महिला बाल विकास अधिकारी शीतल फाळकेंनी केली आत्महत्या

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

शासकीय कार्यालयात भेदभावावरून अधिकाऱ्यास टार्गेट करण्याचे वारंवार प्रकार घडतात. त्यात सरळमार्गी महिला असेल तर तिच्यावर अन्याय वरिष्ठांकडून होत असतो. संवेदनशील अशा भंडारा जिल्ह्यात महिला बाल विकासाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शीतल फाळके या सातारा जिल्ह्यातील सातारा रोड पाडळी येथील शीतल फाळके यांनी आत्महत्या केली.

त्यांनी आपल्या कामातून वेगळी छाप उमटवली होती. त्या गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी भंडारा येथे राहत्या घरात गळफास लावून घेतल्याने सातारा रोड पाडळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आत्महत्या का केली हे समजू शकले नाही.

Related Stories

जबरी चोरीप्रकरणी तडीपार गुंड अटकेत

datta jadhav

पुसेगाव : विहिरीत बेवारस पुरुषाचा सडलेला मृतदेह आढळला

datta jadhav

हंडाभर पाण्यासाठी आखाडेवस्तीकरांची वणवण

Patil_p

Satara : मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांचा आढावा

Abhijeet Khandekar

सातारा एसटी आगारात सरकारी नियमाला तुळशीचे पान

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्हय़ात 635 नवे बाधित, 21 मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!