Tarun Bharat

पाडळी ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप नाही- दत्तात्रेय ढाणे

प्रतिनिधी/नागठाणे

पाडळी (ता.सातारा) येथील ग्रामपंचायतीचा कारभार हा सरपंच संगीता दत्तात्रय ढाणे याच पाहत असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आत्तापर्यंत झालेला नाही. गावातील काही लोकांकडून बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचा खुलासा येथील दत्तात्रेय भिकाजी ढाणे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाडळी ग्रामपंचायतीचा कारभार हा निवडून आल्यापासून माझी पत्नी संगीता ढाणे याच पाहत आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभारात मी कधीही हस्तक्षेप केला नाही. गावच्या विकासासाठी सदैव आम्ही प्रयत्नशील राहिलो आहे.

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा ठराव हा सदस्यांनी केला आहे. त्यामध्ये मी कधीच हस्तक्षेप केला नाही. याबाबत मी कोणालाच पोलिसांमध्ये तक्रार देईन असे वक्तव्यही केले नाही. मात्र गावातील काही लोकांकडून माझ्या व सरपंच संगीता ढाणे यांच्या बदनामीचा जाणून-बुजून प्रयत्न केला जात असून त्यांच्याकडूनच गावाच्या विकासकामाना अडथळा आणणे व विनाकारण त्रास देणे काम केले जात आहे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

सातारा : सामुदायिक फैलावाचा धोका असुन ही नागरिक बिनधास्त रस्त्यावर

Archana Banage

इचलकरंजी येथे दीड लाखांचा गुटखा जप्त

Archana Banage

कोरोनाच्या नावाखाली ग्रामपंचायतीच्या रक्कमेवर राज्य शासनाचा दुहेरी दरोडा

Archana Banage

सेवानिवृत्त जवानांची कराडमध्ये जंगी मिरवणूक

Patil_p

अतुल दामले यांच्याकडून कन्या शाळेस 50 हजाराची देणगी

Patil_p

गोडोलीत 73 हजारांची घरफोडी

datta jadhav