Tarun Bharat

पाडव्याच्या मुहुर्तावर खरेदीला झुंबड

सोशल डिस्टंसचा उडतोय फज्जा

प्रतिनिधी/ सातारा

 हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा हा सण मात्र मागील वर्षी प्रमाणेच कोरोना व लॉकडाऊनच्या गर्तेत अडकला आहे. इतके असले तरी मात्र सोमवारी पाडव्याच्या मुहुर्तावर खरेदीकरीता बाजारपेठेत एकच झुंबड उडाली होती.

 नागरिकांची ही गर्दी अगदी सकाळ पासुन सध्याकाळपर्यंत पहावयास मिळत होती. या गर्दीत मात्र सोशियल डिस्टेसिंगचा चांगलाच फज्जा उडाला होता. ‘साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त’ असलेल्या या गुढीपाडवा सणाचे महत्व ही तितकेच आहे. या अनुषंगाने प्रत्येकांच्या घरोघरी गुढी उभारली जाते. याकरीता साखर माळ, नविन वस्त्रs, फुले, कळस आदी साहित्याचा वापर करून अगदी पहाटेच्या दरम्यान ही गुढी उभारली जाते.

 तसेचे कोणतेही नविन कार्य सुरूकरावयाचे असल्यास किंवा एखादी नविन वस्तु खरेदी करावयाची असल्यास या दिनाच्या शुभमुहुर्तावर केले जाते. त्यामुळे या सणानिमित्त साहित्य खरेदीकरीता बाजारपेठेत नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. कित्तेक ठिकाणी तर लॉकडाऊन होण्याच्या फायदा घेत भाजी-पाला अधिक दराने विक्री करण्यात येत होता. नागरिक ही नाईलाजास्तव अधिक रक्कम देऊन खरेदी करताना दिसत होते.

आकर्षक गुढी बाजारात दाखल

या सणाचे औचित्य साधुन छोटेखानी आकर्षक अशा गुढय़ा बाजारपेठेत विक्रीस दाखल झाल्या होत्या अगदी 100 रूपयांपासुन ते 200 रूपयांपर्यंत या गुढी विक्री करण्यात येत होत्या. महिल्यावर्ग ही अगदी उत्सुकतेने या गुढीची खरेदी करताना दिसत होत्या. तसेच राजवाडा येथील गोलबाग परिसरात गुढी उभारण्यासाठी लागणारे बांबु खरेदीसाठी ही मोठ्ठी गर्दी झाली होती. याचबरोबर रंगीबेरंगी आकर्षक अशा साखर माळांची मागणी ही मोठय़ा प्रमाणात वाढली होती.

दुकानांचे अर्धे शटर उघडुन व्यवसाय

 कोरोनाच्या रूग्नसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सध्या जिल्हाप्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण कित्तेक व्यापारीवर्गांनी याबाबत चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही व्यापाऱयांनी तर या सणाचेच दिवस आपल्या व्यवसायाला पुरक असल्याने प्रशासनाचे नियम झुगारत आपले व्यवसाय सुरू ठेवले होते. काहींनी आपल्या दुकानांचे शटर अर्धे उघडुन गुपचुप व्यवसाय सुरू ठेवला होता.

कडक लॉकडाऊन होण्याची भिती

 सध्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात नागरिकांची गर्दी पहावयास मिळत आहे. मुख्य़तः गुरूवार पासुन कडक लॉकडाऊन होण्याच्या भितीने ही गर्दी उफाळली होती. कारण लॉकडाऊन काळात जीवनोपयोगी साहित्य मिळेल की नाही त्यामुळे कोणतीही गैरसोय होऊ नये याकरीता साहित्य खरेदी करण्यात येत होते.

Related Stories

विशाखा समितीकडून झाली चौकशी

Patil_p

राज्यात शाळा पुन्हा सुरू होणार; शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

Archana Banage

सातारा : अतीतमध्ये दहा तर नागठाणेत पाच कोरोना बाधित

Archana Banage

आमदार निलंबनावर 11 जुलैलाच सुनावणी

datta jadhav

लाळ खुरकत रोगाच्या उच्चाटनासाठी लसीकरण करावे

Omkar B

सातारा : बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा

Archana Banage