Tarun Bharat

पाणबुडय़ांचा बचाव करणारी एससीआय साबरमती मुरगाव बंदरात

प्रतिनिधी /वास्को

भारतीय नौदलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱया गोवा सागरी परीषदेनिमित्त एससीआय साबरमत्ती हे पाणबुडी बचाव जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले आहे. नौदलाच्या जहाजावरील अधिकाऱयांनी प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी व काही निवडक मान्यवरांना या जहाजाला भेट देण्याचे आमंत्रण दिले होते. नौदलाने या जहाजाची ओळख माध्यमांना करून दिली.

रविवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या गोवा सागरी परीषदेचा समारोप मंगळवारी झाला. या परीषदेनिमित्त गोव्यात दाखल झालेल्या एससीआय साबरमती  या जहाजाविषयी सविस्तर माहिती दिली. एखादय़ा दुर्घटनेत सापडल्यानंतर पाणबुडी व त्या पाणबुडीतील कर्मचारी वर्गाला वाचवण्याचे काम हे जहाज करते. पाणबुडीला वाचवण्याची सक्षम यंत्रणा या जहाजात तैनात असते. पाणबुडी संकटात असल्याची किंवा त्या जहाजावरील खलाशी, अधिकारी किंवा अन्य कुणी आजारी असल्याची  व मदतीची याचना करताच हे जहाज कोणत्याही वेळी पाणबुडीच्या दिशेने धाव घेत असते. बचाव कार्य आणि आवश्यक मदतही करीत असते. भारतीय नौदलाकडे अशा प्रकारची दोन जहाजे असून एक मुंबई आणि दुसरी विशाखापट्टमच्या समुद्रात तैनात असते. ही जहाजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची असून त्याचा वापर भारतीय नौदलाकडून होत असतो.

ही जहाजे कशी आहेत. ती कशा प्रकारे काम करतात. कशा प्रकारे त्यांचा वापर आणीबाणीच्या प्रसंगी पाणबुडय़ांसाठी करण्यात येतो याची माहिती यावेळी एससीआय साबरमतीवरील अधिकाऱयांनी दिली. या जहाजावरील बचाव यंत्रणा, जहाजाची क्षमता, वैद्यकीय सुविधा व इतर सोयीसुविधांविषयीही त्यांनी माहिती दिली. अशा जहाजांमुळे भारतीय नौदलाची बचाव यंत्रणा सक्षम करण्यास बळ मिळालेले असल्याचे या अधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

पिसुर्लेतील पाणी टंचाईचा अहवाल सादर करा

Amit Kulkarni

म्हादई रक्षणासाठी होम हवन ’सेव्ह म्हादई

Patil_p

रावण सत्तरी भाजी उत्पादनात अग्रेसर

Patil_p

मोप विमानतळ म्हणजे ‘फिल गोवा’!

Amit Kulkarni

पुणेरी स्टाईलने युवकाची समजूत काढत पुरोहिताने प्राण वाचविले

Amit Kulkarni

प्रलंबित भत्ता वाढ मागणीसाठी म्हापसा पालिका कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

Omkar B