Tarun Bharat

पाणीपुरवठा कर्मचाऱयांचे पुन्हा आंदोलन

वेतनवाढ करण्याची मागणी : चार दिवसांपासून कामबंद, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा           

प्रतिनिधी /बेळगाव

शहराला पाणीपुरवठा करणाऱया कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन केले आहे. त्यांचा  तिढा सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली होती. या बैठकीत निश्चितच तुमची समस्या निकालात काढू, मात्र तातडीने तुम्ही कामावर हजर होऊन काम सुरू करा, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. मात्र पाणीपुरवठा मंडळातील कर्मचाऱयांनी आम्हाला 10 हजार वेतनामध्ये हे काम करणे अशक्मय आहे. तेव्हा वेतन वाढवून द्या, तेव्हाच काम करू, असा आग्रह धरण्यात आला.

शहराला पाणीपुरवठा करणाऱया महामंडळातील कर्मचाऱयांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे. याचबरोबर सरकारी नोकराप्रमाणे वेतन द्यावे. महापालिकेकडूनच वेतन मिळावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे आम्ही महापालिकेच्या अखत्यारित काम करत असताना वेगवेगळय़ा कंपन्यांकडे पाणीपुरवठा विभाग सोपविला जात आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने आम्हाला कामावर रुजू करून त्या कंपन्यांच वेतन देत आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन यापुढेही सुरूच ठेवणार, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा मंडळाच्या कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये आयुक्तांनी बैठक घेऊन चर्चा केली. मात्र यामध्ये कोणताच तोडगा निघाला नाही. महापालिका आयुक्तांनी तुम्ही कामावर रुजू व्हा आम्ही तुमची ही समस्या सरकारकडे पाठवून देवू, आपल्या हातात काही नाही. तेव्हा तुम्ही कामाला सुरुवात करा, अन्यथा दुसरे कामगार रुजू करून घेऊ आणि पाणीपुरवठा सुरळीत करू, असे महापालिका आयुक्तांनी या कर्मचाऱयांना सांगितले. त्यावर त्यांनी जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. महापालिकेसमोर पुन्हा या कर्मचाऱयांनी आंदोलन करून निषेध नोंदविला आहे.

Related Stories

शहरासह तालुक्यात रक्षाबंधन उत्साहात

Omkar B

त्या खटल्याचीही सुनावणीही लांबणीवर

Patil_p

क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूट संघाचा 56 धावांनी विजय

Amit Kulkarni

प्रतिटन 2700 रुपये एकरकमी बिल देणार

Patil_p

बेकिनकेरेत पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

Amit Kulkarni

कोरोना जागृतीसाठी ‘बांधकाम मजुराची धडपड’

Patil_p